Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
चीन मधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनाव्हायरस (COVID-19) ने आतापर्यंत जगभरातील अनेक देशांत आव्हान निर्माण केले आहे. जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) पब्लिक हेल्थ एमरजंसी घोषित केली आहे. चीनमध्ये या व्हायरसने आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला असून 80 हजार लोक संक्रमित झाले आहेत. चीनमध्ये या व्हायरसने धुमाकुळ घातला असून इतर देशांत ही कोरोनाव्हायरची प्रकरणे वाढली आहेत. भारतात आता पर्यंत 29 रुग्ण आढळून आले आहेत. याआधी तीन रुग्ण आढळून आले होते त्यांना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले आहे.
याशिवाय दक्षिण कोरियामध्ये देखील या व्हायरची 6000 प्रकरणे समोर आली आहेत तिथे 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये 4000 लोकांना या व्हायरसचे संक्रमण झाले असून 100 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
भारतामध्ये काय आहे Novel Coronavirus (COVID-19) ची स्थिती?
कोरोना व्हायरसची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर आता भारत सरकार देखील याबाबत सतर्क झाले आहे. नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवदर्धन यांनी म्हटले आहे की, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. देश या व्हायरसशी लढण्यास पूर्णपणे तयार आहे. या व्हायरसला थांबवता येणार नाही याचा त्यांनी इन्कार केला. त्यांनी सांगितले, चीन, सिंगापूर थायलंड. हाॅगकाॅंग, दक्षिण कोरिया व्हियतनाम मलेशिया, नेपाळ इडोनेशिया, इराण, आणि इटली या 12 देशांतून येणा-या सगळ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. 21 विमानतळे, 12 प्रमुख तर 65 लहान बंदरे तर रस्तेमार्गावार विशेषकरुन नेपाळच्या सीमेवर तपासणी होत आहे.
आतापर्यंत विमानतळांवर 5,57,431 प्रवाशांची आणि बंदरांवरती 12,431 प्रवाशांची तपासणी केली गेली आहे. प्रवाशांची दैनिक आधारावर IDSP नेटवर्कच्या माध्यमातून निगरानी केली जात आहे. याशिवाय डाॅ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, सध्या 15 लॅब आहेत लवकरच 19 नवीन लॅब सुरु करण्यात येणार आहेत. त्यानी भारतीय नागरिकांना जास्त गरज नसेल तर सिंगापूर कोरिया, इराण आणि इटलीचा दौरा न करण्याचा सल्ला दिला आहे.
भारताने एक ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी केली असून चीन आणि इराणचे सगळे विसा रद्द केले आहेत. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार भारतीय दुतावास प्रवासासंबंधी नियमांच्या बाबतीत अन्य देशांच्या संपर्कात आहे. सरकार इराण आणि इटलीतील सरकारशी चर्चा करुन भारतीय नागरिकांना परत घेऊन येण्याची योजना तयार करत आहे. याशिवाय कोरोना व्हायरस संदर्भात तक्रार किंवा सूचनांसाठी एक काॅल सेंटर सुरु करण्यात आले आहे. याचा संपर्क क्रमांक 0112397804 असून हे 24 तास सुरु आहे.
Novel Coronavirus ची लक्षणे
कोरोनावायरस (COVID-19) मध्ये सुरवातीला ताप येतो. यानंतर कोरडा खोकला आणि मग एक आठवड्यानंतर श्वास घेण्यास त्रास होते, पण ही लक्षणे कोरोना व्हायरसचीच असतील असे नाही. सर्दी, नाक वाहणे आणि तापामध्ये देखील याची लक्षणे आढळून येऊ शकतात.
Novel Coronavirus पासून बचावासाठी काय कराल ?
या व्हायसरमुळे संक्रमित झालेल्या परिसरात जाणे टाळावे. जर तुम्ही अशा भागाजवळ राहत असाल तर याचे कटाक्षाने पालन करावे.
जर तुम्ही संक्रमित परिसरातून परतला असाल तर काही दिवस घरातच रहा. जास्त लोकांना भेटू नका कुठल्याही प्रकारचा शारीरिक संपर्क येऊ देऊ नका. असे 14 दिवसांपर्यंत करा यामुळे संक्रमणाचा धोका कमी होईल, व्हायरसची लक्षणे दिसताच लगेच डाॅक्टरांशी संपर्क साधा.
नोव्हेल कोरोना व्हायरसपासून बरे होण्यासाठी आतापर्यंत तरी कोणतीही ही लस तयार झालेली नाही. वैज्ञानिक लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या वर्षाअखेरपर्यंत या व्हायरसवर उपचार उपलब्ध होण्याची आशा आहे. तो पर्यंत डा्रक्टर याच्या लक्षणांना बरे करण्याची औषधे डाॅक्टरांना देत आहेत.
कोरोनावायरस (COVID-19) संबंधी प्रत्येक माहिती आणि अपडेटवर Newschecker नजर आहे, जर तुम्हाला या व्हायरस संबंधी काही माहिती माहिती किंवी संशयित बातमी आढळून आल्यास ती आमच्याशी शेअर करा.
फेसबुक साठी: Newschecker @Facebook
ट्विटरसाठी: Newschecker @Twitter
E-mail करा: checkthis@newschecker.in
WhatsApp करा: 9999499044
Prasad S Prabhu
April 25, 2025
Komal Singh
April 24, 2025
Runjay Kumar
April 24, 2025