Claim–
तुळशीचा रस पिल्याने कोरोनाचा परिणाम होणार नाही.
दाव्याचे संक्षिप्त विवरण–
सोशल मीडियामध्ये तुळसीचा रस पिल्याने कोरोना व्हायरसचा परिणाम होत नसल्याचा दावा करणारा आज तक या हिंदी वृत्तवाहिनीचा स्क्रीनशाॅट व्हायरn होत आहे. यात म्हटले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ही सूचना जारी केली आहे
Verification–
आम्ही यासंदर्भात पडताळणी सुरु केली. खरंच तुळशीचे सेवन केल्याने किंवा रस पिल्याने कोरोनाचा परिणाम होत नाही का याबाबत शोध सुरु केला मात्र आम्हाला अशी कोणतीही बातमी आज तक या वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर किंवा यूट्यूब चॅनलवर आढळून आली नाही. यानंतर आम्ही बारकाईने व्हायरल स्क्रीनशाॅट हा एडिटेड आहे हे ओरिजनल व्हिडिओवरुन लक्षात आले
आम्ही जागतिक आरोग्य संघटनने तुळशीच्या उपायाबद्दल खरच काही माहिती दिली आहे का याचा शोध घेतला मात्र
WHO च्या वेबसाईटवर अशी कोणतीही माहिती आढळली नाही. WHO च्या माहितीनुसार कोरोना व्हायरसवर कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाहीत अनेक देशांनी या विषाणू पुढे हात टेकले आहेत.
दैनिक भास्करच्या बातमीनुसार आयुर्वेदाचार्य अबरार मुल्तानी यांनी तुळशीचा रस हा रोगप्रतिकार शक्ती वाढवतो मात्र तो कोरोनाचा विषाणू नष्ट करत नाही.याशिवाय आज तक या वृत्तवाहिनीने देखील त्यांच्या नावाने खोटा स्क्रीनशाॅट व्हायरल झाल्याचे म्हटले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की जागतिक आरोग्य संघटनने तुळशीचे सेवन केल्याने कोरोना व्हायरसचा नष्ट होत असल्याचे म्हटलेले नाही. आज तक वृत्तवाहिनीच्या बातमीच्या एडिटेड स्क्रीनशाॅटद्वारे भ्रामक माहिती सोशल मीडियात शेअर केली जात आहे.
Source
Google keyword Search
Sharechat
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)