Saturday, December 10, 2022
Saturday, December 10, 2022

घरCoronavirusबाॅयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला का ? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

बाॅयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला का ? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

Claim– बाॅयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडले आहे. सर्वांना सूचित करण्यात येते की, बाॅयलर चिकन खाऊ नये.
Verifcation
चीनसह अनेक देशांत कोरोना व्हायरसने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियामध्ये या व्हायरस संदर्भात अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. अशीच एक पोस्ट सध्या फेसबुकवर शेअर होतेय. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बाॅयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडले आहे. सर्वांना सूचित करण्यात येते की, बाॅयलर चिकन खाऊ नये.
याशिवाय आम्हाला आणखी काही फेसबुक पोस्ट आढळून आल्या ज्यात हाच दावा करण्यात आला आहे.
याबाबत आम्ही गूगलमध्ये शोध घेतला पण कुठेही ब्राॅयरल चिकन मध्ये कोरोनाचा विषाणू आढळल्याची बातमी दिसून आली नाही. यानंतर आम्ही शोध सुरुच ठेवला असता आम्हाला poultryawareness.com या वेबसाईटवर याबाबत दिलेले स्पष्टिकरण आढळून आले. यात मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित शंकर

रानडे यांनी चिकनमध्ये कोरोना व्हायरस आढळल्याची अफवा पसरल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियात जे कोंबड्यांच्या आजाराचे किंवा चिकनचे फोटो व्हायरल होत आहे ते राणीखेत आजाराचे आहेत त्याचा कोरोना व्हायरसची संबंध नाही. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसू) येणाऱ्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने कोरोना विषाणूसंदर्भात पसरवल्या जाणाऱ्या
अफवांना शास्त्रीय माहितीद्वारे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याचे डॉ. रानडे यांनी सांगितले. “भारतामध्ये मांसाहाराची पद्धत सर्वाधिक सुरक्षित आहेत. चिकन व मटण उकळवून शिजवून घेतले जातात. पाणी हे 100 डिग्री तापमानाशिवाय उकळले जात नाही. एव्हढया तापमानात कुठलाही विषाणू जिवंत राहू शकत नाही. कारण कुठलाही विषाणू साधारण 27 ते 45 डिग्री पेक्षा अधिक तापमानात
जगत नाहीत. शिवाय, भारतात मांसाहारी पदार्थ शिजवताना आले, हळद आदी औषधी गुणधर्माचे मसाले वापरले जातात. त्यामुळे आजपर्यंत चिकन-मटणातून एखाद्या विषाणूजन्य रोगाची बाधा झाल्याच्या भारतात नोंदी नाहीत,” असे डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले.

यावरुन हेच स्पष्ट होते की ब्राॅयरल चिकनमध्ये कोरोना व्हायरस आढळून आल्याचे एक ही प्रकरण भारता घडलेले नाही. सोशल मीडियामध्ये चुकीचा दावा व्हायरल होत आहे.
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular