Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeCoronavirusसरकारने रेशनकार्ड नसलेल्या लोकांना धान्य मिळण्यासाठी फाॅर्म प्रसिद्ध केला नाही, खोटा दावा व्हायरल

सरकारने रेशनकार्ड नसलेल्या लोकांना धान्य मिळण्यासाठी फाॅर्म प्रसिद्ध केला नाही, खोटा दावा व्हायरल

Authors

Claim
ज्या गरीब लोकांना रेशन कार्ड नाही त्यांनी हा फाॅर्म भरुन दिला की लाॅक डाऊनच्या काळात धान्य मिळेल.

दाव्याचे संक्षिप्त विवरण-
सध्या सोशल मीडिया मध्ये एक फाॅर्म व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की ज्या गरीब लोकांना रेशन कार्ड नाही त्यांनी हा फाॅर्म भरुन दिल्यानंतर कोरोनाच्या संकटादरम्यान त्यांना रेशन उपलब्ध होणार आहे. हा फाॅर्म जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या नावाने आहे. तो तलाठ्याकडे जमा करावा असेही काही पोस्टमध्ये म्हटले आहे.
व्हेरिफिकेशन
आमच्या एका वाचकाने व्हाट्सअॅप व सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म वर व्हायरल होत असलेल्या या फाॅर्मची पडताळणी करण्यासाठी हा फाॅर्म आम्हाला फाॅर्वड केला.
राज्य सरकारने रेशन कार्ड नसणा-या गरीबांसाठी असा फाॅर्म जारी केला आहे की नाही याबाबत आम्ही पडताळणी सुरु केली. याच दरम्यान आम्हाला एबीपी माझाची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की राज्य सरकाने तीन महिन्याचे धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला असून ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही असे गरीब लोक देखील उपाशी राहणार नाहीत त्यांना देखील रेशन दुकानात असलेल्ा एक फाॅर्म भरुन दिल्यास मोफत धान्य मिळणार आहे. यात कुठेही व्हायरल फार्मचा  उल्लेख नाही.
आम्ही याबाबत शोध सुरुच ठेवला. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर अध्यादेश किंवा फाॅर्म उपलब्ध आहे का याचा शोध घेतला असता आम्हाला अशी कोणतीही माहिती आढळून आली नाही. माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या वेबसाईटवर देखील ही माहिती नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागाशीसंपर्क साधला असता, सरकारने असा अर्ज प्रकाशित केलेला नाही अशी माहिती विभागाकडून मिळाली.
याशिवाय आम्हाला माहिती संचालनालयाचे ट्विट आढळून आले यात म्हटले आहे की, सोशल मीडियात व्हायरल झालेला फॉर्म खोटा आहे. रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेला नाही.नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी सोशल मीडियावरून व्हायरल कुठलाही फॉर्म भरून देऊ नये – अन्न, नागरी पुरवठा विभागाचे आवाहन.
यावरुन हेच स्पष्ट होते की महाराष्ट्र सरकारने रेशन कार्ड नसणा-या लोकांसाठी फाॅर्म उपलब्ध केलेला नाही. सोशल मीडियात शेअर होत असलेला फाॅर्म बनावट आहे. त्यावर कोणी विश्वास ठेवू नये.
Source 
Google Search
Result-False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular