Sunday, October 6, 2024
Sunday, October 6, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: कर्नाटकातील पुजाऱ्यांचा २०१५ मधील व्हिडीओ दिशाभूल करीत होतोय व्हायरल

फॅक्ट चेक: कर्नाटकातील पुजाऱ्यांचा २०१५ मधील व्हिडीओ दिशाभूल करीत होतोय व्हायरल

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
पहिल्यांदा मशीद आणि चर्चमधील पैसे घेऊन या असे म्हणत कर्नाटकातील पुजारी सरकारी अधिकाऱ्यांशी भांडत आहेत.
Fact
मंदिरात हुंडी बसवण्यासाठी विरोध करणाऱ्या कोलार येथील कोलारम्मा मंदिरातील पुजाऱ्यांचा २०१५ मधील व्हिडीओ दिशाभूल करीत शेयर केला जात आहे.

कर्नाटकातील पुजाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून दावा केला जात आहे की, कर्नाटकातील पुजारी मंदिरातील हुंडीतून पैसे गोळा करण्यासाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना मशीद आणि चर्चमधून देणगी गोळा करण्याची मागणी करीत हुज्जत घालत आहेत. हुंडी ही एक संग्रह पेटी आहे ज्याचा उपयोग भाविकांकडून पैसे अर्पण करण्यासाठी केला जातो.

आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर मिळाला.

फॅक्ट चेक: कर्नाटकातील पुजाऱ्यांचा २०१५ मधील व्हिडीओ दिशाभूल करीत होतोय व्हायरल
WhatsApp Viral Message

Fact Check/ Verification

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्सवर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केला असता, आम्हाला prajavani.net ने ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रसिद्ध केलेली एक बातमी सापडली.

फॅक्ट चेक: कर्नाटकातील पुजाऱ्यांचा २०१५ मधील व्हिडीओ दिशाभूल करीत होतोय व्हायरल
Courtesy: Prajavani

प्रजावानी द्वारे प्रकाशित केलेली बातमी सांगते की, “कोलारम्मा मंदिरातील पूजेला विराम” व्हिडिओमध्ये घटनेचे तपशीलवार वर्णन आहे. यानुसार, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ केव्ही त्रिलोकचंद्र आणि मुझराई विभागाचे अधिकारी मंदिरात आले. त्यानंतर पूजेत गुंतलेल्या पुजाऱ्यांचा अधिकाऱ्यांशी वाद झाला.”

मंदिराचे पुजारी चंद्रशेकर दीक्षित म्हणाले की, ते सहसा मंदिरात पूजा करतात आणि त्यांना सरकारकडून वेतन मिळत नाही. मंदिरातील भक्त मंगळवारी ताटात पैसे देतात, दीक्षित पुढे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी त्यांना कोणतीही सूचना दिली नव्हती.

जिल्हाधिकारी त्रिलोकचंद्र यांनी सांगितले की, “कोलारम्मा आणि सोमेश्वर मंदिर मुझराइ विभागाच्या ताब्यात आहेत. कोलारम्मा मंदिरात आठ वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने हुंडी लावली होती. हुंडी काढण्यासाठी पुजाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असता, ते खटला हरले. म्हणून, “न्यायालयीन आदेशानुसार हुंडीची स्थापना करण्यात आली आहे,” असेही बातमीत म्हटले आहे.

ही घटना २०१५ ची असून सध्याची नाही असे सांगणारे दोन ट्विट आम्हाला मिळाले. यामध्ये “हा व्हिडिओ मूळतः प्रजा टीव्हीने 31 ऑक्टोबर 2015 रोजी शेअर केला होता जो आता अनुपलब्ध आहे आणि काही संस्था आणि लोकांनी जणू काही अलीकडचे आहे, असे सांगत शेयर केला आहे” असे म्हटले आहे. हे ट्विट येथे आणि येथे पाहता येतील.

Conclusion

पहिल्यांदा मशीद आणि चर्चमधील पैसे घेऊन या असे म्हणत कर्नाटकातील पुजारी सरकारी अधिकाऱ्यांशी भांडत आहेत, हा दावा खोटा आहे. २०१५ मधील जुना व्हिडीओ शेयर करीत दिशाभूल करण्यात येत आहे. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले.

Result: Missing Context

Our Sources
News published by Prajavani on October 31, 2015
Tweet made by user @surnell on August 4, 2020
Tweet made by user @Rgl4bjp on August 7, 2020


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular