Tuesday, December 10, 2024
Tuesday, December 10, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: अतिशय सुंदर पद्धतीने प्रचार म्हणत व्हायरल श्रीराम घोषाचा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील...

फॅक्ट चेक: अतिशय सुंदर पद्धतीने प्रचार म्हणत व्हायरल श्रीराम घोषाचा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील कानपूरचा आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
अतिशय सुंदर पद्धतीने इमारतीतून श्रीराम घोष करीत महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात झाली.
Fact

व्हायरल झालेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील कानपूरचा आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंदू संघटना लोकांना राष्ट्रवाद लक्षात घेऊन मतदान करण्याचे आवाहन करत होते.

अतिशय सुंदर पद्धतीने इमारतीतून श्रीराम घोष करीत महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात झाली असे सांगत एका इमारतीमधून श्रीराम जयघोष करणाऱ्या नागरिकांचा व्हिडीओ शेयर केला जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा दावा केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

फॅक्ट चेक: अतिशय सुंदर पद्धतीने प्रचार म्हणत व्हायरल श्रीराम घोषाचा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील कानपूरचा आहे
Courtesy: X@Vini_007

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका सोसायटीमधील लोक आपापल्या घराच्या बाल्कनीत उभे राहून जय श्री रामचा नारा देत आहेत. यासोबतच २० तारखेला राष्ट्रवाद डोळ्यासमोर ठेवून मतदान करण्याचे आवाहनही लोकांना केले जात असल्याचे ऐकू येते. योगायोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सुद्धा २० नोव्हेंबरला होणार असल्याने हा व्हिडीओ महाराष्ट्रातील प्रचाराचा असल्याचे समजून शेयर होतोय.

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या INVID च्या माध्यमातून मुख्य किफ्रेम्स काढून त्यावर Google वर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला Politics Solitics या फेसबुक पेजने हाच व्हिडीओ १७ फेब्रुवारी २०२२ रोजी “ये सोसाइटी जय श्री राम के नारों से गूंज उठा!” या कॅप्शनखाली पोस्ट केला असल्याचे निदर्शनास आले.

फॅक्ट चेक: अतिशय सुंदर पद्धतीने प्रचार म्हणत व्हायरल श्रीराम घोषाचा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील कानपूरचा आहे
Courtesy: FB/ Politics Solitics

यावरून हा व्हिडीओ २०२२ पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आणि सध्याचा नसल्याचे आम्हाला समजले. संकेत घेऊन आम्ही संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून शोध घेतला असता, आम्हाला विश्व हिन्दू परिषद बजरंग दल प्रखण्ड बाँसखोह या पेजने १५ फेब्रुवारी २०२२ रोजी हाच व्हिडीओ शेयर केला असल्याची माहिती मिळाली.

फॅक्ट चेक: अतिशय सुंदर पद्धतीने प्रचार म्हणत व्हायरल श्रीराम घोषाचा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील कानपूरचा आहे

“प्रभात फेरी , कानपुर पश्चिम……ये सोसाइटी जय श्री राम के नारों से गूंज उठा!” अशी कॅप्शन आम्हाला पाहायला मिळाली.

कानपूर पश्चिम आणि प्रभातफेरी तसेच २०२२ ची घटना याचा सुगावा घेऊन आम्ही इंटरनेटवर शोध घेतला असता, “कानपुर येथील कल्याणपूरच्या गौतम नगर अंतर्गत नवशीलधाम सोसायटी, रतन ऑर्बिट अपार्टमेंट, कान्हा श्याम अपार्टमेंट, डिव्हिनिटी होम अपार्टमेंट, गुलमोहर अपार्टमेंट, इम्पीरियल हाईट अपार्टमेंट, आणि इंद्र नगर आदी विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दैनंदिन प्रभातफेरी आयोजित करण्यात आली होती. जयजयकार करत कल्याणपूर स्थानकासमोरील जीटी रोड येथे त्याची सांगता झाली. अशाच पद्धतीने दररोज प्रभातफेरी आयोजित केली जात होती.” अशी माहिती १२ फेब्रुवारी २०२२ च्या एका पोस्टमधून आम्हाला मिळाली. या पोस्टमध्ये घालण्यात आलेले फोटो व्हायरल व्हिडिओशी मिळते जुळते आढळले.

फॅक्ट चेक: अतिशय सुंदर पद्धतीने प्रचार म्हणत व्हायरल श्रीराम घोषाचा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील कानपूरचा आहे

आम्ही नवशीलधाम सोसायटी, रतन ऑर्बिट अपार्टमेंट, कान्हा श्याम अपार्टमेंट, डिव्हिनिटी होम अपार्टमेंट, गुलमोहर अपार्टमेंट, इम्पीरियल हाईट अपार्टमेंट आदी कानपूर मधील ठिकाणे गुगल मॅपवर शोधून पाहिली. आम्हाला व्हायरल व्हिडिओमधील दृश्ये ही डिव्हिनिटी होम अपार्टमेंटशी मिळती जुळती वाटली.

फॅक्ट चेक: अतिशय सुंदर पद्धतीने प्रचार म्हणत व्हायरल श्रीराम घोषाचा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील कानपूरचा आहे

डिव्हिनिटी होम कानपूरच्या फेसबुक पेजवरही असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हायरल व्हिडिओतील बिल्डिंगचे दर्शन घेता येते.

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात व्हायरल झालेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील कानपूरचा आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळचा व्हिडीओ सध्याचा महाराष्ट्रातील व्हिडीओ म्हणून शेयर केला जात आहे.

Result: False

Our Sources
Facebook post by Politics Solitics on February 17, 2024
Facebook post by VHP on February 15, 2024
Facebook post by Sanatani Abhishek Sinh Chouhan on February 12, 2024
Analysis on Google Map

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular