Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
खोट्या माहितीचा पाऊस पाडण्यात मागील आठवडाही अपवाद राहिला नाही. अनेक चुकीच्या माहितीचे दावे धुमाकूळ घालून गेले. उष्माघाताने काहींचा मृत्यू झाल्याने ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार परत देणार असे विधान पत्राद्वारे केल्याचा दावा झाला. विंग कमांडर अभिनंदन याने पुलवामा हल्ला हा भाजपचा पूर्वनियोजित डाव होता असे म्हटल्याचा दावा झाला. शुभेच्छा संदेशातून फिशिंग कोड पाठवून हॅकर्स वैयक्तिक बँकिंग माहिती चोरू शकतात, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देणारी जाहिरात व्हीआयपी बॅग कंपनीने बनविली आहे आणि महामार्गावरील बिबट्याचा व्हिडीओ पुणे आणि नागपूर जवळील आहे या आणि इतर दाव्याचे फॅक्ट चेक आपण या रिपोर्ट मध्ये पाहणार आहोत.
आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन देणारा व्हिडीओ व्हीआयपी बॅगच्या जाहिरातीसाठी बनविण्यात आला आहे, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि राशी आपण सरकारला परत करणार असे आप्पासाहेब धर्माधिकारी एका पत्राद्वारे म्हणाले असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
विंग कमांडर अभिनंदन ने म्हटले आहे की, पुलवामा हल्ला ही भाजपची विचारपूर्वक केलेली कृती होती, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे उघड झाले.
बिबट्याचे दर्शन पुण्यातील भोसरीजवळ आणि नागपूर जवळील कोरडी जवळ झाले आहे, असा दावा एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
व्हाट्सअप वर येणाऱ्या शुभेच्छा संदेशांमध्ये हॅकर्सनी घातलेल्या फिशिंग कोड मुळे युजर्सची वैयक्तिक माहिती धोक्यात आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
June 14, 2025
Prasad S Prabhu
June 6, 2025
Prasad S Prabhu
May 24, 2025