Saturday, October 12, 2024
Saturday, October 12, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: चार किडनी उपलब्ध असल्याचा मेसेज जुना आणि खोटा आहे, जाणून...

फॅक्ट चेक: चार किडनी उपलब्ध असल्याचा मेसेज जुना आणि खोटा आहे, जाणून घ्या सत्य

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
अपघातात जखमी दांपत्याच्या चार किडनी उपलब्ध असून दान करायच्या आहेत.
Fact

हा मेसेज अनेक वर्षांपासून व्हायरल असून पूर्णपणे खोटा आहे.

चार किडनी उपलब्ध असे सांगत एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघातात जखमी दांपत्याच्या चार किडनी उपलब्ध असून दान करायच्या आहेत, असे हा मेसेज सांगतो.

फॅक्ट चेक: चार किडनी उपलब्ध असल्याचा मेसेज जुना आणि खोटा आहे, जाणून घ्या सत्य
Courtesy: X@Hawda_bridge

“किडनी उपलब्ध सर्व मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे 4 किडनी उपलब्ध आहेत. आमचे कौटुंबिक भाऊ श्री सुधीर आणि त्यांच्या पत्नीचा काल अपघातात मृत्यू झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले आहे. श्री सुधीर हे B+ आणि त्यांची पत्नी O+ आहे. त्याच्या कुटुंबीयांना त्याची किडनी मानवतेसाठी दान करायची आहे. कृपया प्रसारित करा. 8591722260/ 7249818851वर संपर्क साधावा दुसर्‍या गटाला फॉरवर्ड करा, ते एखाद्यास मदत करू शकते…” असे मेसेजमधील दाव्यात म्हटले आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

फॅक्ट चेक: चार किडनी उपलब्ध असल्याचा मेसेज जुना आणि खोटा आहे, जाणून घ्या सत्य

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही दाव्यात दिलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क केला. आम्हाला त्यापैकी दोन्ही फोन बंद स्थितीत असल्याचे आढळले. आम्ही हे क्रमांक इंटरनेटवर कोठे उपलब्ध आहेत का? हे शोधण्याचा प्रयत्न केला मात्र आम्हाला याबद्दल माहिती मिळाली नाही.

दरम्यान दाव्यातील माहितीवरून आम्ही इंग्रजी कीवर्डसच्या माध्यमातून शोधून पाहिले असता, आम्हाला संबंधित दावा इंग्रजी भाषेतून २०१७ पासूनच इंटरनेटवर अवलंबून असल्याचे दिसून आले. २६ डिसेंबर २०१७ रोजी Kirit Chiki Chohan नामक युजरने हा दावा फेसबुकवर इंग्रजी भाषेतून पोस्ट केला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

फॅक्ट चेक: चार किडनी उपलब्ध असल्याचा मेसेज जुना आणि खोटा आहे, जाणून घ्या सत्य
Courtesy: FB/ Kirit Chiki Chohan

यावरून हे समजले की हा मेसेज नवा नसून जुना आहे. अपघातात मृत्यू झालेल्या दांपत्याच्या बाबतीत असा प्रकार घडला होता का? हे शोधण्याचा प्रयत्न केला. Google वर या कीवर्ड शोधून, आम्हाला ९ डिसेंबर २०१९ रोजी The Hindu वर प्रकाशित झालेली बातमी सापडली. “एक व्हॉट्सॲप मेसेज व्हायरल होत आहे जो किडनी उपलब्ध असल्याचे सांगतो मात्र त्यातील क्रमांक सुरु नाहीत. दरम्यान इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे माजी राज्य अधिकारी डॉ. सल्फी नुहू सांगतात की सरकारने ‘मृतसंजीवनी’ सारखी योजना अवयव दानाच्या जागृतीसाठी सुरु करून इतक्या वर्षांनीही अशाप्रकारचे मेसेज व्हायरल होणे हा खोडकरपणाच आहे. तसेच अवयव दान आणि रोपणाच्या प्रक्रियेबद्दल यामुळे संशय निर्माण केला जात आहे.” असे या बातमीत म्हटले आहे.

फॅक्ट चेक: चार किडनी उपलब्ध असल्याचा मेसेज जुना आणि खोटा आहे, जाणून घ्या सत्य
Courtesy: The Hindu

Onmanorama च्या वेबसाइटवर ५ सप्टेंबर २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, चार किडनी उपलब्ध असल्याचा संदेश फॉरवर्ड करून, तुम्ही मानवतेचा नव्हे तर स्कॅमचा प्रचार करत आहात. ही टोळी पैशांची फसवणूक करण्यासाठी असे मेसेज फिरवत असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

फॅक्ट चेक: चार किडनी उपलब्ध असल्याचा मेसेज जुना आणि खोटा आहे, जाणून घ्या सत्य
Courtesy: OnManorama

दरम्यान आम्ही National Kidney Foundation च्या वेबसाईटवर जाऊन माहिती जाणून घेतली. किडनी ट्रान्सप्लांट कशापद्धतीने केले जाते याची प्रक्रिया त्यामध्ये आहे. दरम्यान व्हायरल मेसेज जुना, खोटा आणि सर्व अधिकृत वैद्यकीय प्रक्रियांना छेद देणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात अपघातात जखमी दांपत्याच्या चार किडनी उपलब्ध असून दान करायच्या आहेत, असे सांगणारा मेसेज खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
Facebook post by user Kirit Chiki Chohan on December 26, 2017
Article published by The Hindu on December 9, 2019
Article published by OnManorama on Suptember 5, 2021
Information on National Kidney Foundation website


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular