Saturday, October 12, 2024
Saturday, October 12, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: कर्नाटक पोलिसांनी विसर्जनाच्या वेळी गणेश मूर्तीला अटक केली का? सत्य...

फॅक्ट चेक: कर्नाटक पोलिसांनी विसर्जनाच्या वेळी गणेश मूर्तीला अटक केली का? सत्य जाणून घ्या

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांना रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी गणेशमूर्तीला अटक केली.
Fact
हा दावा दिशाभूल करणारा आहे.

कर्नाटक पोलिसांनी विसर्जनाच्या वेळी गणेश मूर्तीला अटक केली असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: कर्नाटक पोलिसांनी विसर्जनाच्या वेळी गणेश मूर्तीला अटक केली का? सत्य जाणून घ्या
Courtesy: X@mangeshspa

दाव्याचे संग्रहण इथे पाहता येईल.

11 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या वेळी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात दोन गटात हाणामारी झाली. मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथील बदारीकोप्पलू येथून भक्त दोन गणेश मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात होते. यावेळी मिरवणूक धार्मिक स्थळी पोहोचली असता काही हल्लेखोरांनी दगडफेक केली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली आणि दोघांनी आपापल्या धार्मिक घोषणा देण्यास सुरुवात केली. परिस्थिती इतकी बिघडली की, बेकाबू जमावाने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि दुकानांना आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला.

गणेश चतुर्थीनंतर विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांना रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी गणेशमूर्ती ताब्यात घेतल्याचा दावा पोलिस व्हॅनमध्ये ठेवलेल्या गणेश मूर्तीच्या फोटोसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो शेअर करताना असाही दावा केला जात आहे की, गणेशाची पूजा केल्याने धार्मिक सलोखा बिघडतो, त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी गणेशाला अटक केली आहे.

गणेशाला अटक करून हिंदू धर्माचा अपमान करणारे कर्नाटकचे काँग्रेस सरकार हिंदूविरोधी असल्याचा दावा करत पोलीस व्हॅनमध्ये दिसलेल्या गणेशाच्या मूर्तीचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले जात आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, आम्ही संबंधित कीवर्डसाठी Google शोधले. यावेळी आम्हाला या प्रकरणाशी संबंधित अनेक मीडिया रिपोर्ट्स प्राप्त झाले. टाइम्स ऑफ इंडियाने 14 सप्टेंबर 2024 रोजी प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ही बाब शुक्रवार, 13 सप्टेंबर रोजी घडली. 11 सप्टेंबर 2024 रोजी गणेश विसर्जनाच्या वेळी कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यात झालेल्या जातीय हिंसाचाराच्या निषेधार्थ काही लोक बेंगळुरूमधील टाऊन हॉलमध्ये पोहोचले होते. आंदोलकांसोबत 1 फूट उंचीची गणेशमूर्तीही होती. यावेळी पोलिसांनी परवानगी न घेता आंदोलन करण्यासाठी आलेल्या 40 जणांना ताब्यात घेतले आणि दरम्यान एका पोलिसाने गणेशाची मूर्ती उचलून पोलिस व्हॅनमध्ये ठेवली.

हे ज्ञात आहे की बेंगळुरूमधील टाऊन हॉलमध्ये पोहोचलेले आंदोलक गणेश मूर्तींसह निदर्शने करत होते आणि 11 सप्टेंबर रोजी शहरातील दुकाने आणि वाहनांना लक्ष्य करणाऱ्यांवर आणि दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत होते.

‘द प्रिंट’ च्या रिपोर्टमध्ये एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटले आहे की, “लोकांचा एक गट टाऊन हॉलसमोर निदर्शने करण्यासाठी पुढे जात होता, परंतु ते कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच आम्ही त्यांना थांबवले कारण तेथे निषेध करण्यास परवानगी नव्हती. मात्र आंदोलक तिथे जाण्यावर ठाम राहिल्याने त्यांना ताब्यात घ्यावे लागले. त्यापैकी सुमारे 40 जणांना प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले.”

फॅक्ट चेक: कर्नाटक पोलिसांनी विसर्जनाच्या वेळी गणेश मूर्तीला अटक केली का? सत्य जाणून घ्या

15 सप्टेंबर 2024 रोजी न्यूज 18 ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, टाऊन हॉलजवळ पोलिसांची परवानगी नसतानाही गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात आंदोलन करण्याचे नियोजन केले जात होते, तर बेंगळुरूमध्ये नियमानुसार आंदोलकांसाठी परवानगी असलेले ठिकाण म्हणजे फ्रीडम पार्क आहे. टाऊन हॉलमध्ये विनापरवाना लोक जमत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस व्हॅनमध्ये बसवण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोंधळ उडाला आणि काही लोकांनी गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन घोषणाबाजी सुरू केली.

बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी न्यूज 18 ला सांगितले की, “पोलिसांनी आधीच आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आणि जेव्हा त्यांना समजले की गणेश मूर्ती जमिनीवर पडली आहे, तेव्हा आमच्या अधिकाऱ्याने लगेचच मूर्ती उचलली आणि ती सुरक्षित ठिकाणी ठेवली.”

फॅक्ट चेक: कर्नाटक पोलिसांनी विसर्जनाच्या वेळी गणेश मूर्तीला अटक केली का? सत्य जाणून घ्या

बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी दयानंद यांनी न्यूज18ला पुढे सांगितले की, ‘पर्यवेक्षणाशिवाय आपण गणपतीला कसे सोडू शकतो? आमच्या अधिकाऱ्याने मूर्ती सुरक्षितपणे नेली आणि ती विसर्जनासाठी नेली जाणार असल्याने विसर्जन पूर्ण आदराने आणि भक्तिभावाने झाले. व्हॅनमधील गणेशाचे चित्र दाखवते की आम्ही मूर्तीचे पावित्र्य आणि आदर कसा राखला.

16 सप्टेंबर 2024 रोजी हिंदुस्तान टाईम्सने प्रकाशित केलेल्या वृत्तात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा हवाला देऊन स्पष्टीकरण दिले होते की आंदोलकांना ताब्यात घेतले जात असताना मूर्तीला पोलिस व्हॅनमध्ये ठेवण्यात आले होते.

बेंगळुरू सेंट्रल डिव्हिजनचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) म्हणाले, “13 सप्टेंबर 2024 रोजी, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून नागमंगला गणेश मिरवणुकीच्या घटनेवर हिंदू गटांनी बेंगळुरूमधील टाऊन हॉलमध्ये निषेध केला. आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.” “नंतर अधिकाऱ्यांनी पूर्ण विधींनी गणपती मूर्तीचे विसर्जन केले.”

फॅक्ट चेक: कर्नाटक पोलिसांनी विसर्जनाच्या वेळी गणेश मूर्तीला अटक केली का? सत्य जाणून घ्या

15 सप्टेंबर 2024 रोजी, पोलिस उपायुक्त, मध्य विभाग, बेंगळुरू यांनी त्यांच्या अधिकृत X खात्यावरून पोस्ट केले आणि स्पष्टीकरण दिले. त्यांनी लिहिले (अनुवादित), “सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टबाबत स्पष्टीकरण ज्यात म्हटले आहे की बंगळुरूमधील टाऊन हॉलजवळ विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांकडून अधिका-यांनी गणेशमूर्ती हिसकावून घेतल्या… 13 सप्टेंबर 2024 रोजी हिंदू गटांनी नागमंगला घटनेवरून बेंगळुरूमधील टाऊन हॉलमध्ये निदर्शने केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून. आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. नंतर अधिकाऱ्यांनी पूर्ण विधीपूर्वक गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले. पोस्टसोबतच गणपती विसर्जनाचे फोटोही शेअर केले आहेत.”

तपासादरम्यान आम्ही बेंगळुरू पोलिसांशीही संपर्क साधला आहे. प्रतिक्रिया आल्यावर आर्टिकल अपडेट केले जाईल.

Conclusion

तपासातून आम्ही निष्कर्षाप्रत पोहोचतो की, कर्नाटक पोलिसांनी गणेशमूर्तीला अटक केल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.

Result: False

Sources
Report published by Times of India on 13th September,2024.
Report published by Hindustan Times on 16th September 2024.
X post by Deputy Commissioner of Police, Central Division, Bengaluru City on 15th September 2024.


(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी कोमल सिंग यांनी केले असून, ते इथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular