Thursday, November 7, 2024
Thursday, November 7, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: खासदार पप्पू यादव यांचा रडण्याचा जुना व्हिडिओ बाबा सिद्दीकी यांच्या...

फॅक्ट चेक: खासदार पप्पू यादव यांचा रडण्याचा जुना व्हिडिओ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर दिलेल्या वक्तव्याशी जोडून व्हायरल

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
पप्पू यादव यांनी आधी लॉरेन्स बिश्नोईला धमकावले, पण शुद्धीवर आल्यानंतर ते ढसाढसा रडू लागले.
Fact
व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे 6 वर्षे जुना आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पूर्णियाचे खासदार पप्पू यादव रडताना दिसत आहेत. मुंबईतील बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी जोडणारा हा व्हिडीओ शेअर केला जात असून दावा केला जात आहे की, पप्पू यादवने पहिल्यांदा लॉरेन्स बिश्नोईला धमकावले पण शुद्धीवर आल्यानंतर तो ढसाढसा रडू लागला.

मात्र, आमच्या तपासात आम्हाला आढळून आले की, व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे 6 वर्षे जुना आहे. खरेतर, 6 सप्टेंबर 2018 रोजी एससी-एसटी कायद्यातील दुरुस्तीच्या निषेधार्थ उच्चवर्णीयांनी भारत बंद पुकारला होता. त्याचवेळी बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये आंदोलकांच्या एका गटाने पप्पू यादववर हल्ला केला. ही घटना सांगताना पप्पू यादव पत्रकारांसमोर रडले होते.

उल्लेखनीय म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथून तीनदा आमदार झाले होते. वृत्तानुसार, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या खून प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी धर्मराज, शिवकुमार, गुरमेल, जीशान अख्तर, शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर यांची नावे समोर आली आहेत. दरम्यान, या हत्येमुळे संतप्त झालेल्या पप्पू यादवने एक पोस्ट टाकली आणि लिहिले की, “अगर कानून अनुमति दे तो 24 घंटे में इस लारेंस बिश्नोई जैसे दो टके के अपराधी के पूरे नेटवर्क को खत्म कर दूंगा”.

हा व्हिडीओ त्यांच्या वक्तव्याशी जोडून शेअर केला जात आहे, ज्यामध्ये पप्पू यादव रडताना दिसत आहेत. व्हिडिओ अलीकडील दाव्याच्या कॅप्शनसह शेयर केला जात आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “ये है पप्पू यादव कल लॉरेंस विश्नोई को 24 घण्टे में ठिकाने लगा रहे थे और जब होश आया तो कैसे छोटे बच्चों की तरह रो रहे है”.

फॅक्ट चेक: खासदार पप्पू यादव यांचा रडण्याचा जुना व्हिडिओ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर दिलेल्या वक्तव्याशी जोडून व्हायरल
Courtesy: X/124AKHILHYV

हा व्हिडिओ फेसबुकवरही शेअर करण्यात आला आहे.

फॅक्ट चेक: खासदार पप्पू यादव यांचा रडण्याचा जुना व्हिडिओ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर दिलेल्या वक्तव्याशी जोडून व्हायरल
Courtesy: fb/हिंदूवादी विनय शर्मा

Fact Check/ Verification

दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तेव्हा, आम्हाला बिहारमधील स्थानिक मीडिया आउटलेट लाइव्ह सिटीजचा लोगो दिसला. जेव्हा आम्ही संबंधित कीवर्डच्या मदतीने Google वर शोध घेतला तेव्हा आम्हाला 6 सप्टेंबर 2018 रोजी लाइव सिटिजच्या YouTube खात्यावरून अपलोड केलेला संपूर्ण व्हिडिओ सापडला.

फॅक्ट चेक: खासदार पप्पू यादव यांचा रडण्याचा जुना व्हिडिओ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर दिलेल्या वक्तव्याशी जोडून व्हायरल
Courtesy: YT/Live Cities

या व्हिडिओमध्ये पप्पू यादववर मुजफ्फरनगरमध्ये हल्ला झाल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांचे प्राण वाचवले होते. ही घटना सांगताना पप्पू यादव रडू लागले आणि म्हणाले की, “माझ्याकडे रक्षक नसते तर त्यांनी मला मारले असते.”

याशिवाय, आम्हाला 6 सप्टेंबर 2018 रोजी एबीपी न्यूजच्या यूट्यूब खात्यावर अपलोड केलेला याशी संबंधित व्हिडिओ रिपोर्ट देखील सापडला. पप्पू यादववर मुझफ्फरनगर येथील खाबरा येथे हल्ला झाल्याचेही या व्हिडिओ रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. पप्पू यादव मधुबनी ते पाटणा असा पायी प्रवास सुरू करण्यासाठी बसोपट्टीला जात होते. यादरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यानंतर मीडियासमोर आपली परिस्थिती सांगताना ते रडू लागले.

फॅक्ट चेक: खासदार पप्पू यादव यांचा रडण्याचा जुना व्हिडिओ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर दिलेल्या वक्तव्याशी जोडून व्हायरल
Courtesy: YT/ABP News

6 सप्टेंबर 2018 रोजी आज तकच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, पप्पू यादवने मुझफ्फरपूरमधील बालिका गृह कांड घटनेच्या विरोधात महिलांच्या सुरक्षेसाठी मधुबनी ते पाटणा असा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. याची सुरुवात करण्यासाठी ते मधुबनी येथील बसोपट्टी येथे जात होते. त्यानंतर मुझफ्फरनगरमध्ये सवर्ण संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या आंदोलकांनी पप्पू यादव यांचा ताफा रोखला होता. सवर्ण संघटनांनी अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) सुधारणा कायद्याविरोधात भारत बंदची घोषणा केली होती.

फॅक्ट चेक: खासदार पप्पू यादव यांचा रडण्याचा जुना व्हिडिओ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर दिलेल्या वक्तव्याशी जोडून व्हायरल

काफिला थांबवल्यानंतर पप्पू यादवने विनवणी केल्यावर आंदोलकांपैकी एका गटाने त्यांना जाऊ दिले, मात्र दुसऱ्या गटाने त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना पप्पू यादव यांनी रडत रडत सांगितले की आमचे रक्षक नसते तर त्यांनी आम्हाला मारले असते.

2023 मध्येही आम्ही या व्हिडिओची तपासणी केली होती, तेव्हाही तो शेअर केला जात होता. त्या काळातही, आम्हाला आमच्या तपासात असे आढळून आले होते की हा व्हिडिओ SC/ST कायद्यातील दुरुस्तीच्या विरोधात 2018 साली सवर्ण संघटनांनी पुकारलेल्या निदर्शनादरम्यान पप्पू यादव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा होता.

Conclusion

आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की हा व्हिडिओ 2018 सालचा आहे, जेव्हा SC/ST कायद्याच्या विरोधात सवर्ण संघटनांनी पुकारलेल्या निदर्शनादरम्यान पप्पू यादव यांच्यावर हल्ला झाला होता.

Result: Missing Context

Our Sources
Video Report by Live Cities on 6th Sep 2018
Video Report by ABP News on 6th Sep 2018
Article Published by AAJ TAK on 6th Sep 2018


(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular