Friday, December 6, 2024
Friday, December 6, 2024

HomeFact CheckFact Check: अमित शहा यांना बेड्या घातलेले पोस्टर्स संसदेत दाखविण्यात आले? जाणून...

Fact Check: अमित शहा यांना बेड्या घातलेले पोस्टर्स संसदेत दाखविण्यात आले? जाणून घ्या सत्य

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
अमित शहा यांना बेड्या घातलेले पोस्टर्स संसदेत दाखविण्यात आले.
Fact

हा दावा खोटा आहे. बिहारचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार मेहबूब आलम यांनी बिहार विधानसभेत अमित शहा यांच्याबद्दलचे हे पोस्टर दाखविले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमोल शहा यांना बेड्या घातलेले पोस्टर संसदेत दाखविण्यात आले. असे सांगणारा एक दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक व्हिडिओच्या माध्यमातून हा दावा केला जात आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: अमित शहा यांना बेड्या घातलेले पोस्टर्स संसदेत दाखविण्यात आले? जाणून घ्या सत्य

दाव्यासोबत एक फेसबुक लिंक देण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये तसेच कॅप्शनमध्ये अमित शहा यांना तडीपार बोलले जात असून त्यांनी आपल्या बेड्या रुमालाने झाकल्या असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही संबंधित व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. यामध्ये एकाद्या लोकनियुक्त सभागृहात भाषण सुरु असल्याचे दिसते. बोलत असलेल्या व्यक्तीच्या नावाखाली ‘श्री. मेहबूब आलम, माननीय सदस्य’ असे लिहिलेले आम्हाला दिसले. यावरून आम्ही मेहबूब आलम या व्यक्तीबद्दल शोध घेतला. आम्हाला व्हिडिओत दिसणारी व्यक्ती हे मेहबूब आलम म्हणजेच बिहार विधानसभेचे सदस्य आणि कम्युनिस्ट पार्टीचे नेते असल्याची माहिती मिळाली.

Fact Check: अमित शहा यांना बेड्या घातलेले पोस्टर्स संसदेत दाखविण्यात आले? जाणून घ्या सत्य
X handle of Mahaboob Alam

संबंधित व्यक्ती बिहारची आमदार असल्याने त्यांनी संसदेत भाषण करणे अशक्य ठरते. संसदेत भाषण करण्याचा अधिकार खासदारांना देण्यात आलेला आहे. दरम्यान हा दावा चुकीचा असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

दरम्यान यावरून सुगावा घेऊन आम्ही शोध घेतला असता, आम्हाला १६ जुलै २०२३ रोजी गुलबर्गा हेडलाईन्स नामक युट्युब चॅनेलने प्रसारित केलेला एक युट्युब व्हिडीओ सापडला.

“VIRAL Speech | Amit Shah Ki Tadipar Wali Photo Lekar Bihar Vidhansabha Pahunche Mehboob Alam” अशी कॅप्शन आम्हाला वाचायला मिळाली. यावरून अमित शहा यांना तडीपार केल्याबद्दलचे बेड्या घातलेले पोस्टर घेऊन मेहबूब आलम बिहार विधानसभेत गेल्याची पुष्टी आम्हाला मिळाली. मात्र यासंदर्भात कुठलेही मीडिया रिपोर्ट्स उपलब्ध न झाल्याने पोस्टर दाखविण्याची ही कृती नेमकी केंव्हा झाली होती याची नेमकी माहिती आम्ही मिळवू शकलेलो नाही.

अमित शहा आणि त्यांचे तडीपार प्रकरण नेमके काय आहे? याचा शोध आम्ही घेतला असता, आम्हाला बोल भिडू ने यासंदर्भात प्रसारित केलेला व्हिडीओ पाहायला मिळाला.

सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी झालेल्या कारवाईत अमित शहांवर ही तडीपारीची कारवाई झाली होती. याबद्दल त्यांचे विरोधक त्यांच्यावर नेहमीच तोंडसुख घेत असतात. याच कारवाईचा उल्लेख बिहारचे आमदार मेहबूब आलम यांनी बिहार विधानसभेत केला असल्याचे आणि त्याला चुकीचे संदर्भ देऊन व्हायरल केले जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Conclusion

यावरून आमच्या तपासात, अमित शहा यांना बेड्या घातलेले पोस्टर्स संसदेत दाखविण्यात आले, असे सांगणारा दावा संदर्भ बदलून दिशाभूल करीत केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिहारचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार मेहबूब आलम यांनी बिहार विधानसभेत अमित शहा यांच्याबद्दलचे हे पोस्टर दाखविले होते.

Result: Missing Context

Our Sources
X account of MLA Mahaboob Alam
Video published by Gulbarga Headline on July 16, 2023
Video published by Bol Bhidu on Suptember 23, 2021


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular