Thursday, July 18, 2024
Thursday, July 18, 2024

HomeFact CheckFact Check: इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळच्या चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात...

Fact Check: इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळच्या चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले? सत्य जाणून घ्या

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळ चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले.
Fact
व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. 2020 मध्ये झालेल्या छापेमारी दरम्यान केरळमधील एका चर्चमधून 6 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.

केरळच्या चर्चमधून प्राप्तिकर विभागाने 7000 कोटी रुपये जप्त केल्याचा दावा सोशल मीडियावर फोटोसह केला जात आहे.

14 जून 2024 रोजी, X युजरने दोन फोटोंचा कोलाज पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ईडी ने केरल लिनी बेलोरियन चर्च से 7000 करोड़ रुपये की काली कमाई जब्त की है। योहानन नाम का एक बिशप इसे चलाता है। अभी तक ये मामला कहीं भी खबरों में नहीं आया है।” कोलाजच्या एका चित्रात पैशाचे अनेक गठ्ठे दिसत आहेत आणि दुसऱ्या चित्रात दिसत असलेली व्यक्ती योहानन नावाचा बिशप असल्याचे म्हटले आहे. येथे एक्स पोस्ट आणि तिचे संग्रहण पाहता येईल.

Fact Check: इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळच्या चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले? सत्य जाणून घ्या
Courtesy:  X/@Modified_Hindu9

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळच्या चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले? सत्य जाणून घ्या

Fact Check/ Verification

दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही Google वर काही कीवर्ड शोधले. या काळात केरळमधील एकाही चर्चवर छापा टाकल्याची माहिती आम्हाला मिळाली नाही. तपासादरम्यान आम्हाला 6 नोव्हेंबर 2020 रोजी टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेला रिपोर्ट समोर आला. रिपोर्टमध्ये केरळमधील बिलिव्हर्स चर्चमध्ये 5 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या छाप्याची माहिती दिली आहे.

Fact Check: इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळच्या चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले? सत्य जाणून घ्या

या छाप्याबाबत प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयकर विभागाने नोव्हेंबर 2020 मध्ये बिलिव्हर्स ईस्टर्न चर्चवर छापा टाकला होता. या काळात प्राप्तिकर विभागाने केरळमधील बिलिव्हर्स ईस्टर्न चर्चच्या 40 हून अधिक केंद्रांवर छापे टाकले. यावेळी, आयकर विभागाने थिरुवेल्ला येथील बिलिव्हर्स ईस्टर्न चर्चच्या मुख्यालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारच्या ट्रंकमधून 57 लाख रुपये जप्त केले होते. परदेशातून मिळालेल्या देणग्या रिअल इस्टेट आणि खाजगी गुंतवणुकीत गरिबांच्या नावावर खर्च केल्याचा आरोप चर्चवर होता. अधिकाऱ्यांचा हवाला देत रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की आयकर विभाग गेल्या 10 वर्षांपासून चर्चच्या व्यवहारांच्या खात्यांचा शोध घेत होता आणि यादरम्यान गृह मंत्रालयाने बिलिव्हर्स ईस्टर्न चर्चचे एफसीआरए खाते बंद केले होते. तत्सम मीडिया रिपोर्ट येथे, येथे आणि येथे वाचता येतील.

Fact Check: इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळच्या चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले? सत्य जाणून घ्या

वित्त मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्राप्तिकर विभागाने 6 नोव्हेंबर 2020 रोजी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात केरळमध्ये छापेमारी दरम्यान 6 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Fact Check: इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळच्या चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले? सत्य जाणून घ्या

मातृभूमीने प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये या छाप्याशी संबंधित काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत, जी व्हायरल कोलाजसारखी आहेत. कीवर्ड शोधात, आम्हाला आढळले की व्हायरल कोलाजमध्ये दिसणारे धर्मगुरू हे चर्चचे बिशप केपी योहानन आहेत.

Fact Check: इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळच्या चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले? सत्य जाणून घ्या
Fact Check: इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळच्या चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले? सत्य जाणून घ्या

Conclusion

अशा प्रकारे, आमच्या तपासणीतून हे स्पष्ट झाले की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. केरळच्या बिलिव्हर्स ईस्टर्न चर्चमध्ये 2020 च्या छाप्यात 6 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते, दरम्यान 7000 कोटी रुपये जप्त केल्याचा खोटा दावा केला जात आहे.

Result: Missing Context

Sources
Report published by Times of India on November 6th 2020.
Report published by The Hindu on November 6th 2020.
Press Release by Ministry of Finance.
Facebook account of KP Yohannan

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular