Thursday, July 18, 2024
Thursday, July 18, 2024

HomeFact CheckFact Check: हलाल वरून आता वाडीलाल टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे

Fact Check: हलाल वरून आता वाडीलाल टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे

Claim
वाडीलाल आईस्क्रीममध्ये गोमांसाचे फ्लेवर वापरले जात असून त्यासाठी हलाल प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. कंपनीने याचा इन्कार केला असून आपली उत्पादने १०० टक्के शाकाहारी असल्याचे आणि निर्यात मार्केटसाठी आवश्यकतेनुसार हलाल प्रमाणपत्र घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे.

हलाल प्रमाणपत्र घेतले हा संदर्भ घेऊन आता आईस्क्रीम उत्पादक कंपनी वाडीलाल ला टार्गेट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक दावे व्हायरल होत आहेत. “वाडीलाल आईस्क्रीममध्ये गोमांसाचे फ्लेवर वापरले जात असून त्यासाठी हलाल प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.” असे हा दावा सांगतो.

Fact Check: हलाल वरून आता वाडीलाल टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: X@AnilSha89142589

“वाडीलाल आईस्क्रीम का ब्रांड आईसक्रीम मे गोमांस के फ्लेवर का उपयोग करता है और इसी कारण वाडीलाल ने हलाल सर्टिफिकेट कार्टन पर छाप लिया है तो आज से कोई हिंदू वाडीलाल का आईस्क्रीम न खाए?? सभी हिंदू भाई इसका बड़े पैमाने पर बायकाट करें???* और ये पोस्ट ज्यादा से ज्यादा शेयर करे” असे दाव्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: हलाल वरून आता वाडीलाल टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे

Fact Check/ Verification

दाव्यामध्ये वापरल्या जात असलेल्या इमेजची आम्ही सर्वप्रथम बारकाईने पाहणी केली. वाडीलाल कंपनीच्या “मँगो मलाई, मटका कुल्फी” या उत्पादनाच्या वेष्टनाचा हा फोटो असल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्यावर हलाल चा लोगो आम्हाला दिसला.

Fact Check: हलाल वरून आता वाडीलाल टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: X@AnilSha89142589

यावरून आम्ही काही किवर्डसच्या मदतीने शोध घेत असताना आम्हाला Vadilal Enterprises Ltd. या linkedin प्रोफाईलवर वाडीलाल कंपनीचे एक स्पष्टीकरण सापडले.

Fact Check: हलाल वरून आता वाडीलाल टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: Linkedin/Vadilal Enterprises Ltd

“पिढ्यानपिढ्या, वाडीलाल हे भारतातील एक विश्वसनीय नाव आहे, जे स्वादिष्ट आणि १००% शाकाहारी उत्पादने देतात. तुमची वाडीलाल ट्रीट त्याच काळजीने तयार केली गेली आहे याची खात्री करून आम्ही या वारशाचे पालन करत आहोत जेणेकरून तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या आवडत्या फ्लेवर्सचा आनंद घेऊ शकता. आम्ही अलीकडील अफवांमुळे अजिबात घाबरलो नाही आणि आमच्या १००% शाकाहारी उत्पादनांसह तुम्हाला सेवा देत राहू!” असे स्पष्टीकरणाच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

“वाडीलाल आईस्क्रीम हलाल प्रमाणन असलेली उत्पादने भारतात विकत असल्याची अफवा असून हे खोटे आहे. आम्हाला अभिमान आहे की, आम्ही आमचे आईस्क्रीम्स आणि इतर खाद्यपदार्थ पूर्णपणे शाकाहारी बनवितो. हलाल प्रमाणन लिहिलेले असल्याचे पॅकिंग हे उद्योग नियमांनुसार जेथे आवश्यक आहे अशा निर्यात मार्केट क्षेत्रासाठी बनविलेले आहे. दर्जात्मकता हा आमचा विश्वास असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका.” असे आवाहन कंपनीने केले आहे.

यावरून वाडीलाल कंपनीने निर्यात मार्केटिंगसाठी आवश्यक असलेल्या नियमांनुसार हलाल प्रमाणपत्र घेतले असल्याचे स्पष्ट झाले. मात्र हे प्रमाणपत्र घेतले म्हणून त्याची विक्री भारतात केली जाते आणि उत्पादनामध्ये गोमांसाचे किंवा त्याच्या फ्लेवरचा वापर केला जातो, हा दावा निराधार ठरतो.

हलाल प्रमाणपत्र कशासाठी?

दरम्यान आम्ही हलाल प्रमाणन किंवा प्रमाणपत्र कशासाठी घेतले जाते? याचा शोध घेतला. औषधे, खाद्यपदार्थ आणि कॉस्मेटिकस तयार करणाऱ्या अनेक कंपन्या मांस आणि जनावरांचे अनेक अवशेष आपल्या उत्पादनात वापरतात. यामुळे काही देशात त्यांना हलाल प्रमाणपत्र दिले जात नाही. पूर्णपणे शाकाहारी पद्धतीने काम करणाऱ्या कंपन्यांनाही यामुळे हे प्रमाणपत्र घेऊन आपली उत्पादने विकावी लागतात. अशी माहिती आम्हाला jagran josh येथे मिळाली.

Fact Check: हलाल वरून आता वाडीलाल टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे
Screengrab of Jagran Josh

भारतीय कंपन्यांना प्रदेशात अथवा मुस्लिम राष्ट्रांमध्ये हलाल प्रमाणन असल्याशिवाय आपली उत्पादने विकता येत नाहीत. यामुळे खालील कंपन्यांद्वारे हे प्रमाणपत्र मिळवावे लागते. असेही आम्हाला या आर्टिकलमध्ये सापडली.

Fact Check: हलाल वरून आता वाडीलाल टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे
Screengrab of Jagran Josh

हलाल प्रमाणपत्र देण्याची पद्धत आणि मुस्लिम देशात त्याची आवश्यकता काय आहे, याची माहिती इथे वाचता येईल. युनो ने ही हलाल म्हणजे काय याची माहिती प्रसिद्ध केली असून ती येथे वाचता येईल.

यापूर्वी हलाल प्रमाणन घेतल्यावरून औषधे, कॉस्मेटिकस आणि काही खाद्यपदार्थ बनविणारी कंपनी ‘हिमालया’ सोशल मीडियावर टार्गेट वर आली होती. त्यावेळी न्यूजचेकरने केलेले फॅक्टचेक आपण येथे वाचू शकता.

Conclusion

अशापद्धतीने वाडीलाल कंपनीने हलाल प्रमाणपत्र घेतले या विषयावरून दिशाभूल करणारे दावे केले जात असल्याचे आमच्या तपासात उघड झाले आहे. हलाल म्हणजे मांस वापरले जात असेल असा समज तयार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे. मात्र कंपनीने याचा इन्कार करून आपण १०० टक्के शाकाहारी उत्पादने बनवीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Result: Missing Context

Our Sources
Clarification by Vadilal Enterprises Ltd
General guidelines of UNO on Halal
Article published by twinriverstechnologies on April 9, 2018


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular