Tuesday, April 16, 2024
Tuesday, April 16, 2024

HomeFact Checkकाॅंग्रेसचे उमेदवार मकशूर उस्मानींच्या बाबतीत चुकीचा दावा व्हायरल

काॅंग्रेसचे उमेदवार मकशूर उस्मानींच्या बाबतीत चुकीचा दावा व्हायरल

Authors

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील जाले विधानसभा मतदार संघातील काॅंग्रेसचे उमेदवार मकशूर उस्मानींच्या बाबतीत एक दावा व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, मोदींच्या पाटणा रॅलीचा स्फोट घडवून आणणारा दहशतवादी आफताब आलम याला कॉंग्रेसच्या महायुतीतल्या औरई मतदार संघातून तिकीट देण्यात आलं आहे. नामांकन दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आफताबचे सासर पाकिस्तानात आहे. अलिगढ मुस्लिम युनिवर्सिटीमध्ये पाकिस्तानचे निर्माता मोहम्मद अली जीना यांचा फोटो बसविणा-या मकशूर उस्मानीला देखील काॅंग्रेसने तिकिट दिले आहे.

Fact Check/Verification

आम्ही ट्विटमध्ये केलेल्या दाव्यांची पडताळणी करण्याचे ठरविले. महायुतीतील उमेदवार आफताब आलम याला खरंच बिहार पोलिसांनी अटक केली आहे का आणि मकशूर उस्मानीने मोहम्मद अली जिना यांचा फोटो अलिगड मुस्लिम विद्यापीठात लावला आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता besthindinews या वेबसाईटवर बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत स्फोट घडवून आणल्याचा आरोप असलेल्या आफताब आलम नावाच्या व्यक्तीला महापथबंधनचा घटक असलेल्या भाकप (माले)ने औरई मतदार संघातून तिकीट दिले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या आफताब आलमला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.

यानंतर न्यूज 18 हिंदीची बातमी देखील आढळून आली आफताब आलमला अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

यावरुन सिद्ध झाले की आफताब आलम महागठबंधन (महायुती) मधील उमेदवार असून भाकपा(माले) ने तिकिट दिले आहे, मात्र मकशूर उस्मानी यांच्याबाबतीतील दावा कितपत खरा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता. आम्हाला अमर उजाला या हिंदी वेबसाईटवर उस्मानी यांच्याविषयीचा लेख आढळून आला.

यात म्हटले आहे की, मशकूर अहमद उस्मानी बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी आहेत. संविधान दुरुस्ती अधिनियम 2019 आणि राष्ट्रीय नागरिकत्व निषेधाचा निषेध करणारे म्हणून उस्मानी ओळखले जातात. 2017 मध्ये ते अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (एएमयू) स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.

त्यांनी अजय सिंग यांचा 6,719 मतांनी पराभव केला. 2018 मध्ये त्यांनी भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आणि एएमयूमध्ये आमंत्रित केले. 2019 मध्ये त्यांनी सीएए-एनआरसी, भारतीय नागरिकत्व अधिनियम, 2019 मध्ये केलेल्या सुधारणांविरूद्ध मोहीम सुरू केली. 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जाले मतदारसंघातून उस्मानी यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. जेडीयू आणि भाजपने यावर कटाक्ष टाकला आहे. वास्तविक, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (एएमयू) विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष असताना उस्मानी यांच्यावर जिन्नांचे फोटो लावल्याचा आरोप करण्यात आला. यावरुन बराच गोंधळ माजला होता.

यानंतर आम्हाला बीबीसी हिंदीची एक बातमी आढळून ज्यात म्हटले आहे की, मोहम्मद अली जिना यांचा फोटो एएमयूमध्ये 1938 पासून आहे.

याशिवाय आम्हाला उस्मानी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुरक्षा देण्याची मागणी केल्याचे पत्र त्यांच्या ट्विटर हॅंडलवर आढळून आले. यात त्यांनी त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचे व जिविताला धोका असल्याचे म्हटले आहे.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, काॅंग्रेसचे उमेदवार मकशूर उस्मानी यांच्याबाबत चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

Result: Misleading

Our Source

Amar Ujala- https://www.amarujala.com/bihar/bihar-election-2020-know-who-is-mashkoor-ahmad-usmani-jale-congress-candidate-amu-president-bjp-jdu-jinnah

BBC- https://www.bbc.com/hindi/india-43973398

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular