Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeFact Checkडाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा लहानपणीचा नाही व्हायरल फोटो, हे आहे सत्य

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा लहानपणीचा नाही व्हायरल फोटो, हे आहे सत्य

Authors

सोशल मीडियात एका लहान मुलाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा लहानपणीचा असल्याचा दावा केला जात आहे. ब्लॅक अॅंड व्हाईट फोटोत एक लहान मुलगा दिसत आहेत ते लहानपणीचे डाॅ. आंबेडकर असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये

हिंदीत व्हायरल होत असलेल्या या पोस्टमधील फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “क्रांतिकारी जय भीम साथियों, जय भीम का नारा दुनिया में सबसे प्यारा, दुनिया में सबसे सुंदर। बाबा साहेब डॉ भीमराव अंबेडकर। मेरे बाबा साहेब का बचपन का फोटो।”

संग्रहित

फेसबुकवर हा फोटो याच दाव्याने मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे आम्हाला आढळून आले आहे.

Fact Check/Verification

व्हायरल होत असेलेला फोटो डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणीचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेजची मदत घेतली. असता आम्हाला एनडीटीव्हीची 2012 मधील एक बातमी आढळून आली. या बातमीत अजय बोराडे पाटील या 27 वर्षीय युवकाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासरा देशमुख यांच्या फोटोंचे कलेक्शन केले असल्याचे म्हटले आहे. यात त्यांच्या लहानपणीच्या फोटोंचा देखील समावेश आहे.बोराडे पाटील यांनी विलासराव देशमुख यांचे पुत्र अभिनेता रितेश देशमुख यांना जेव्हा त्यांचा संग्रह दाखविला तेव्हा त्यांनी त्यांचे कौतुक केले असेही या बातमीत म्हटले आहे.

यानतंतर अधिक शोध घेतला असता आम्हाला जनसत्ताची तीन वर्षापूर्वीची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारच्या मासिकात डाॅ. आंबेडकरांच्या एवेजी काॅंग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख यांचा फोटो छापला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र अहेड’च्या एप्रिल 2018 च्या अंकात विलासराव देशमुख यांचा फोटो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीचा म्हणून वापरण्यात आल्याचे बातमीत म्हटले आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागने चुक लक्षात येताच याचे वितरण रोखले होते असेही यात उल्लेख केला आहे.

यानंतर आम्हाला काॅंग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांचे ट्विट देखील आढळून आले. यात म्हटले आहे त्यांनी की, डाॅ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या एेवजी विलासराव देशमुख यांचा फोटो छापल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, सोशल मीडियात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरा यांचा लहानपणीचा फोटो म्हणून काॅंग्रेसचे दिवंगत नेते विलासराव यांच्या लहाणपणीचा फोटो शेअर होत आहे.

Read More : टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का?

Result: Misleading

Claim Review:  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लहानपणीचा फोटो
Claimed By: Social Media post
Fact Check: Misleading

Our Sources

NDTV- https://www.ndtv.com/india-news/he-may-be-vilasrao-deshmukhs-biggest-fan-496895

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular