कोरोनामुळे आईवडिल गमावलेल्या मुलींना दत्तक घेण्याचे आवाहन करणारा खोटा मेसेज व्हायरल

Authors

कोरोनामुळे आईवडिल गमावलेल्या मुलींना दत्तक घेण्याचे आवाहन करणारा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मेसेजमध्ये दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करुन या मुलींना दत्तक घ्यावे असे आवाहन देखील यात करण्यात आले आहे.

मेसेजमध्ये काय म्हटले आहे.

दत्तक घेण्यासाठी: जर एखाद्यास मुलगी दत्तक घ्यायची असेल तर कृपया मोकळ्या मनाने 09711104773 (प्रियांका) वर संपर्क साधा. एक मुलगी 3 दिवसांची आणि दुसरी 6 महिन्यांची आहे, कोविडमुळे नुकतेच त्यांचे पालक गमावले आहेत. कृपया या मुलांना नवीन जीवन मिळविण्यात मदत करा, शब्द पसरवा.

Fact Check/Verification

व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर आम्ही संपर्क साधला असता हा नंबर बंद असल्याचे आढळून आले.नंतर आम्ही इंटरनेटवर याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी शोध शुरु केल असता दैनिक लोकमतची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, सोशल मीडियात मुले दत्तक घेण्यासंदर्भातील मेसेज खोटा आहे.

अधिक शोध घेतला असता पीआयबीचे एक ट्विट आढळून आले. यात म्हटले आहे की, अनाथ मुलींना दत्तक घेण्यासाठी आवाहन करणाऱ्या त्या मेसेजवर विश्वास ठेवू नये. अधिकृत प्रक्रियेद्वारेच मूल दत्तक घेणे कायद्याने बंधनकारक आहे

महिला व बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी याबाबत ट्विट केले असून कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांची माहिती तात्काळ पोलिस किंवा बालकल्याण समिती देण्यात यावी असे म्हटले आहे. बालकल्याण समितीला डावलून कोणाकडूनही मूल दत्तक घेणे बेकायदेशीर आहे. तुम्हाला जर मूल थेट दत्तक घ्या म्हणून कोणी संपर्क साधला तर त्वरित पोलिसांना याबाबत माहिती द्या. त्यासाठी आपण चाईल्डलाईन क्रमांक 1098 वर संपर्क साधू शकता. ही माहिते देणे आपली जबाबदारी आहे. कोणीही असहाय्य व लहान मुलांचे फोटो किंवा त्यांची ओळख पटेल असे मेसेज शेअर करू नये असेही ईराणी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून सदर व्हायरल मेसेजची दखल घेत तो बेकायदेशीर, भ्रामक आणि दिशाभूल करणारा फेक असल्याचे सांगितले आहे. शिवाय अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, पुण्यातील कमांड हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी 5000 बेड्स लष्कराने उपलब्ध करुन दिल्याची अफवा सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. जुन्या कमांड हाॅस्पिटलमध्ये काही रुग्णांसाठी सुविधा उभारल्या आहेत मात्र त्यांना तेथे थेट दाखल करता येत नाही त्यासाठी महापालिका किेवा जिल्हा आरोग्य अधिका-याची शिफारस लागते.

Read More : टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का?

Result: False

Claim Review:  कोरोनामुळे आईवडिल गमावलेल्या मुलींना दत्तक घेण्याचे आवाहन
Claimed By: Social Media post
Fact Check: False

Our Sources

PIB- https://twitter.com/PIBFactCheck/status/1389566204151427073

Smriti Irani Tweet- https://twitter.com/smritiirani/status/1389586982809047055


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors