Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeFact Checkव्हायरल फोटो चीनसोबत संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांचा नाही, हे आहे सत्य 

व्हायरल फोटो चीनसोबत संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांचा नाही, हे आहे सत्य 

Authors

दावा

व्हायरल फोटो भारत-चीन संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांचा आहे. 

सोशल मीडियामध्ये एक फोटो व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की हा फोटो चिनी सैन्यांसोबत झालेल्या संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय सैनिकांचा आहे.

पडताळणी-  व्हायरल फोटो चिनी सैन्यांसोबत झालेल्या संघर्षात शहिद झालेल्या भारतीय जवानांचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या आधारे शोध शुरु केला असता फेसबुकवर याच दाव्याने हा फोटो व्हायरल होत असल्याचे आढळून आले. 

https://www.facebook.com/abusaleem.abu.3/posts/2662462217414653AA

संग्रहित

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1534690770043256&id=100005070438732

संग्रहित

या संदर्भात माध्यमांमध्ये भारताचे 20 जवान शहीद झाल्याची बातमी देखील प्रसिद्ध झाल्या होती पण या कुठेही व्हायरल फोटो आढळून आला नाही. 

यानंतर आम्ही व्हायरल फोटो गूगल रिव्हर्स इमेज आणि यांडेक्सच्या मदतीने शोधण्यास सुरुवात केली. या शोधादरम्यान आम्हाला 2015 सालचे एक ट्विट आढळून आले. यात हा फोटो आढळून आला. ट्विटमध्ये म्हटले आहे की हरवलेल्या काही नायजेरियन सैनिकांना बोको हराम या दहशतवादी संघटनेने ठार केले. 

तसेच शोधाच्या दरम्यान आम्हाला nigerianeye.com वेबसाईटवरील लेखात हा फोटो आढळून आला. ज्यात बोको हरामचे दहशतवादी कशा प्रकारे नायजेरियन सैनिकांना ठार करतात याची माहिती आहे. 

याशिवाय 2015 साली एका ब्लाॅगमध्ये देखील हा फोटो शेअर करण्यात आला होता. 

यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल फोटो चीनसोबत झालेल्या संघर्षात हुत्मात्मा झालेल्या भारतीय जवानांनाचा नाही तर चार वर्षांपूर्वी बोको हराम ने ठार केलेल्या नायजेरियन सैनिकांचा आहे. 


Source 

Facebook, Google Reverse Image

Result-  False 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular