Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeFact Checkअमेरिकन डाॅलरवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही, चुकीचा दावा व्हायरल

अमेरिकन डाॅलरवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

अमेरिकन डाॅलरवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेली शंभरची नोट शेअर केली आहे. हिंदीमधील या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जो काम भारत ने नहीं कर पाया वह काम अमेरिकाने कर दिखाया। अमेरिका का की करेंसी पर बाबा साहेब अम्बेडकर का फोटो। (अनुवाद- जे काम भारत करु शकला नाही ते काम अमेरिकने करुन दाखवलं. अमेरिकेच्या चलनावर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो). व्हारल फोटो आम्हाला शेअरचॅट या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर आढळून आला.

आम्हाला हा दावा फेसबुकवर देखील शेअर होत असल्याचे आढळून आले.

https://www.facebook.com/groups/1350797841963223/permalink/1353783451664662

संग्रहित

Fact Check / Verification

भारतात अनेक वर्षांपासून नोटांवर वेगवेगळ्या महापुरुषांचे फोटो छापण्याची मागणी केली जात आहे. परंतु अजून तरी ती मागणी पूर्ण झालेली नाही. अशातच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अमेरिकन डाॅलरवर छापण्यात आल्याचा दावा व्हायरल झाला आहे. हा दावा कितपत खरा आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी पडताळणी सुरु केली. यासाठी आम्ही अमेरिकच्या चलनाच्या वेबसाईटला भेट दिली तिथे आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या डाॅलरच्या नोटांची माहिती दिली आहे. परंतु आम्ही या नोटांमध्ये कुठेही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असल्याची नोट आढळून आली नाही.

अमेरिकने1914 मध्ये पहिल्यांदा शंभर डाॅलरची नोट जारी केली होती या नोटेच्या पुढील बाजूस अमेरिकेच्या फाऊंडर फादर्सपैकी एक बेंजामिन फ्रॅंकलिन यांचा फोटो तर तर मागील बाजूस लेबर, प्लॅंटी, अमेरिका, शांती, वाणिज्याचे दईशन घडविते. यानंतर 1929 रोजी या नोटेत थोडासा बदल करण्यात पुढील बाजुस बेंजामिन फ्रॅकलिन यांचा फोटो तर मागील बाजूस इंडिपेंडेट हाॅलचा फोटो छापण्यात आला.

या नोटेमध्ये अनेक छोटे बदल केले पण पण फ्रॅंकलिन यांचा फोटो हटविण्यात आलेला नाही. आपण अमेरिकन 100 डाॅलरच्या नोटेमध्ये आजपर्यंत केलेले बदल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.

अमेरिकेच्या चलनावर आतापर्यंत फक्त माजी राष्ट्राध्यक्षांचेच फोटो छापण्यात आलेले आहेत. इतर देशांच्या कोणत्याही महापुरुषांचा फोटो अमेरिकन डाॅलरवर छापण्यात आलेला नाही.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, अमेरिकेच्या 100 डाॅलरच्या नोटेवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापण्यात आलेला नाही. सोशल मीडियात फोटोशाॅप्ड इमेज व्हायरल झाली आहे.

Result – Manipulated Media

Our Sources

Us currency- https://www.uscurrency.gov/sites/default/files/downloadable-materials/files/100_1914-1990_features.pdf

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular