Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeFact Checkसंजय राऊत यांच्या भीतीमुळे अण्णा हजारे मुख्यमंत्र्यांना भेटू शकले नाहीत? वाचा अण्णांच्या...

संजय राऊत यांच्या भीतीमुळे अण्णा हजारे मुख्यमंत्र्यांना भेटू शकले नाहीत? वाचा अण्णांच्या ट्विटचे सत्य

Authors

संजय राऊत यांच्या भीतीमुळे अण्णा हजारे मुख्यमंत्र्यांना भेटू शकले नाहीत, अशी माहिती देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे एक ट्विट सध्या सोसल मीडियात व्हायरल होत आहे. हे ट्विट हिंदीत असून अण्णांनी यात म्हटले आहे की, “आम्ही धरणे आंदोलनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी घेण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात गेलो असता आम्हाला बाहेर बसण्यास सांगितले, त्याचवेळी संजय राऊत हातात दांडके व चार चार पोलिसांना सोबत घेऊन तीन वेळा माझ्यासमोरुन येऊन गेले. त्यामुळे आम्ही सर्वजण माघारी आलो. अशाप्रकारे आम्हाला दंडुक्याने धमकावणे ही लोकशाहीची हत्या आहे”.

संजय राऊत यांच्या भीतीमुळे अण्णा हजारे मुख्यमंत्र्यांना भेटू न शकल्याच्या ट्विटचे स्क्रीनशाॅट्स फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.

Fact Check/Verification

खरंच संजय राऊत यांच्या भीतीमुळे अण्णा हजारे मुख्यमंत्र्यांना भेटू शकले नाहीत? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता राज्यातील मंदिरे उघडण्यसाठी आण्णा आंदोलनात सहभागी होणार असल्याची महाराष्ट्र टाईम्सची 29 आॅगस्ट रोजीची बातमी आढळून आली. मात्र यात अण्णा मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याची माहिती आढळून आली नाही.

संजय राऊत यांच्या भीतीमुळे अण्णा मुख्यमंत्री कार्यालयातून परतले असल्याची माहिती देखील माध्यमांत कुठे आढळून नाही त्यामुळे आम्ही व्हायरल होत असलेल्या स्क्रिनशाॅटचे मूळ ट्विट शोधण्याचा प्रयत्न केला असता ट्विटरवर @Anna_Hazare_IND हे ट्विटर अकाउंट आढळून आले व त्यावर 3 सप्टेंबर रोजीचे अण्णांचे व्हायरल ट्विट देखील मिळाले.

अधिक माहितीसाठी आम्ही अण्णा हजारेंचे जनसंपर्क अधिकारी संजय पठाडे यांच्याशी संपर्क साधला व संजय राऊत यांच्या भीतीमुळे अण्णा हजारे मुख्यमंत्र्यांना भेटू शकले नाहीत का याबबात विचारणा केली असता त्यांनी सांमगितले की, “असं काही घडलेले नाही. ज्या ट्विटर अकाउंटवरुन हे ट्विट केले गेले आहे ते अकाउंट अण्णांचे नाही. अण्णांच्या नावाने ट्विटरवर अशा प्रकारची अनेक अकाउंट्स आहेत ती सर्व खोटी आहेत. याची माहिती आम्ही ट्विटरला दिली आहे. तसेच लेखी तक्रार देखील करणार आहोत. अण्णांचे एक अकाउंट आहे पण ते या खोट्या अकाउंट्समुळे व्हेरिफाईड होेऊ शकलेले नाही, त्यामुळे अण्णांनी मागील तीन वर्षापासून ट्विटरचा वापर करणे सोडले आहे. त्यांचे ट्विटरवर अधिकृत अकाउंट नाही. फेसबुकवरील अधिकृत अकाउंटद्वारे अण्णा आपली भूमिका मांडत असतात.

Conclusion 

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, संजय राऊत यांच्या भीतीमुळे अण्णा हजारे मुख्यमंत्र्यांना भेटू शकले नसल्याचे टविट खोटे आहे. त्यांच्या बाबतीत असा प्रसंग घडलेला नाही.

Result- False

Our Source

Maharashtra Times- https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/anna-hazare-warns-thackeray-government-over-temple-issue/articleshow/85716634.cmshttps://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/anna-hazare-warns-thackeray-government-over-temple-issue/articleshow/85716634.cms

Direct contact


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular