Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeFact Checkराहुल गांधींनी भारताची संपत्ती लुटून इटलीमध्ये अरबो रुपयांची बिल्डिंग खरेदी केल्याचा दावा,...

राहुल गांधींनी भारताची संपत्ती लुटून इटलीमध्ये अरबो रुपयांची बिल्डिंग खरेदी केल्याचा दावा, हे आहे सत्य

Authors

राहुल गांधींनी भारताची संपत्ती लुटून इटलीमध्ये अरबो रुपयांची बिल्डिंग खरेदी केल्याचा दावा सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक व्यक्ति हिंदीतून माहिती देत आहे, मैं इटली से एक हिंदुस्तानी बोल रहा हूं यह राहुल गांधी की बिल्डिंग है जो करोड़ों की नहीं बल्कि अरबों रुपए की है भारत से लुट कर के इटली में इतनी संपत्ति बना रखी है पप्पू गांधी ने और मां सोनिया गांधी ने मित्रों आप इस बिल्डिंग को देखेंगे तो आपकी आंखें चक्कर खा जाएगी। असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.

https://www.facebook.com/shivam.mahapatra007/videos/3626702377367388

संग्रहित

ट्विटरवर देखील हा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

संग्रहित

Fact Checking/Verification

व्हायरल व्हिडिओतील बिल्डिंग नेमकी कुठली आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यातील काही किफ्रेम्स काढून रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली असता ही बिल्डिंग इटलीमधील तुरीन भागातील ‘पियाझा कॅसेलो’ असल्याचे समजले. यास ‘कॅसल स्क्वेअर’ असेही म्हटले जाते. याविषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला italy-villas.com या वेबसाईटवर याविषयी माहिती मिळाली. हा बिल्डिंगचा समूह आहे. यामध्ये पलाझो मदामा, ओपेरा हाउस, रॉयल लायब्ररी आणि टोरे लीत्तोरीया या बिल्डिंगचा समावेश आहे.

यामधील राॅयल पॅलेस आॅफ तुरीन चौदाव्या शतकात सेव्हाय वंशाच्या राजकन्येने बांधलेला आहे. ही बिल्डिंग 1995 साली सरकारच्या ताब्यात गेली. आता तिथे ‘रॉयल म्युझियम’ वस्तू संग्रहालय आहे. युनेस्कोने या बिल्डिंगला 1997 मध्ये वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, काॅंग्रसेचे नेते राहुल गांधी यांनी इटलीमध्ये अरबो रुपयांची बिल्डिंग खरेदी केल्याचा दावा केला जात तो चुकीचा आहे. ती जागतिक ठेवा असलेली वास्तु आहे.

Result: False

Our Sources

Residenzereali.it- https://www.residenzereali.it/index.php/en/residenze-reali-del-piemonte/musei-reali

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular