Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeFact Checkआत्महत्येच्या आदल्या रात्रीचा नाही सुशांतसिंह राजपूतचा हा व्हिडिओ, खोटा दावा व्हायरल

आत्महत्येच्या आदल्या रात्रीचा नाही सुशांतसिंह राजपूतचा हा व्हिडिओ, खोटा दावा व्हायरल

Authors

दावा

सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री गाणे गात डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने नुकतीच आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. यानंतर सुशांतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून सुशांत यात यह जमीं गा रही है आसमां गा रहा है या गाण्यावर ठेका धरुन नाचताना दिसत आहे. दावा केला जात आहे की हा व्हिडिओ सुशांतने आत्महत्या करण्याआधीचा आदल्या रात्रीचा आहे.

पडताळणी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने खरंच आत्महत्येच्या आदल्या रात्री डान्स केला होता का याचा शोध घेण्यासाठी शोध सुरु केला असता या संदर्भात अनेक बातम्या आढळून आल्या.

झी न्यूजच्या बातमीनुसार आत्महत्येच्या आदल्या रात्री सुशांत ने रिया चक्रवर्ती आणि अभिनेता महेश शेट्टी या दोघांना काॅल केला होता पण दोघांनीही त्याचा काॅल उचलला नाही. 

झी न्यूज आणि इतर माध्यमांच्या बातम्यांमध्ये कुठेही सुशांतने आदल्या रात्री गाणे गात डान्स केल्याचा उल्लेख आढळला नाही. त्यामुळे आम्ही टिकटाॅकवरल व्हायरल व्हिडिओतून काही स्क्रीनशाॅट्स काढले आणि गूगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने या संदर्भात शोध सुरु केला. या शोधा दरम्यान आम्हाला यूटयूबवर हा व्हिडिओ आढळून आला. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये सुशांत म्युझिकच्या तालावर नाचताना दिसत आहे, तो गाणे गात नाही. यावरुन हेच स्पष्ट होते की अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा दोन वर्षांच्या व्हिडिओ आत्महत्येचा म्हणून व्हायरल झाला आहे. 

Source

TikTok, Google Reverse Image

Result- Misleading

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular