Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeFact CheckViralआयपीएस अधिकारी एन.अंबिका यांच्याविषयी चुकीचा दावा व्हायरल, जाणून घ्या सत्य

आयपीएस अधिकारी एन.अंबिका यांच्याविषयी चुकीचा दावा व्हायरल, जाणून घ्या सत्य

मुंबई पोलिस मुख्यालयात कार्यरत आयपीएस अधिकारी एन. अंबिका यांच्याविषयी सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये अनेक दावे करण्यात आले आहेत. एन अंबिका यांचा 14 व्या वर्षी बालविवाह झाला. पोलिस काॅन्स्टेबलशी लग्न झाले. पतीच्या मार्गदर्शन आणि साहाय्यामुळे त्या आयपीएस पदापर्यंत पोहचू शकल्या इत्यादी माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

सोशल मीडियात व्हायरल होत असलेली पोस्ट इंग्रजीत असून आम्ही त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.

ती बालविवाहाची शिकार होती. वयाच्या 14 व्या वर्षी लग्न केले. तिचे लग्न पोलिस कॉन्स्टेबलशी झाले होते. 18 व्या वर्षी तिला दोन मुले झाली. एके दिवशी तिने तिच्या पतीला उच्च अधिका-यांना सॅल्युट करताना पाहिले. यामुळे तिला उत्सुकता निर्माण झाली. तिने तिच्या नव-याला त्यांच्याबद्दल विचारले. ते म्हणाले की ते आयजी आणि डीजी आहेत, उच्च दर्जाचे अधिकारी, ज्यांनी तरुण वयातच यूपीएससी पास केली आहे. तिने आयपीएस अधिकारी होण्याची इच्छा आपल्या पतीला बोलून दाखवली. तिचा नवरा इतरांप्रमाणे आपल्या पत्नीला गुलाम समजत नव्हता, तिला पाठिंबा देण्यास तयार होता. त्याने तिला मॅट्रिक, इंटरमीडिएट आणि पदवी परीक्षा उत्तीर्ण करण्यास सांगितले. नव-याने सांगितलेल्या सर्व परीक्षा तिने पास केल्या आणि यूपीएससी कोचिंगसाठी चेन्नईला गेली. तिच्या नव-याने आवश्यक व्यवस्था केल्या आणि वचन दिले की तो मुलांची काळजी घेईल. त्याने तिला चांगला अभ्यास करण्यास सांगितले. पहिल्या 3 प्रयत्नांमध्ये अपयशी ठरली परंतु हार मानली नाही. नव-याने तिला परत येण्यास सांगितले, तिने आणखी एक प्रयत्न करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. त्याने देखील ती विनंती मान्य केली. शेवटी, तिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयपीएस झाली. ती एन अंबिका, आयपीएस, डीसीपी, उत्तर मुंबई आहे. अंबिकाने जर फक्त बालविवाहासाठी तिच्या पालकांवर दोषारोप ठेवली असता आणि तिच्या नशिबीला दोष देत बसली असती तर ती आज डीसीपी बनली नसती. सुपर सपोर्टिंग नवरा मिळाल्यामुळे ती खूप भाग्यवान होती. आज अंबिका इतर महिलांसाठी एक आदर्श बनली आहे आणि कदाचित आपल्यात आणखी ब-याच अंबिका दडलेल्या असतील. जर ती करू शकत असेल तर कोणीही करू शकते.

इंग्रजीत व्हायरल होत असेलेली पोस्ट

Fact Check/Verification

आयपीएस अधिकारी एन.अंबिका यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही काही किवर्डच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला याच दाव्याचे काही लेख इंटरनेटवर आढळून आले.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही पुढे शोध सुरु ठेवला असता आम्हाला आयपीएस एन.अंबिका यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ आढळून आला. ज्यात त्यांनी आपण 2009 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असल्याची माहिती दिली आहे. असून मुंबईतील झोन-4 मध्ये डेप्युटी पोलिस कमिश्ननर पदावर काम करत असल्याचे सांगितेल आहे. जन्म तमिळनाडूमधील Dindigul जिल्ह्यामध्ये झाला. दहावीला 500 पैकी 477 मार्क मिळाले. दहावीला असताना बस स्टॅंड समोरच कलेक्टरचा बंगला असल्याचे पाहिले होते तेव्हापासून कलेक्टर बदद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कलेक्टर बनण्यासाठी काय करावे लागते याची माहिती घेतली. लग्नाबद्दल माहिती देताना सांगितले आहे की, लग्न काॅलेजच्या पहिल्या वर्षाला असताना झाले. माझ्या पतीने अभ्यास करु देणार असल्याचे वचन दिले होते म्हणूनच मी त्यांच्याशी लग्न केले. नव-याच्या पायगुणामुळेच मी आयपीएस बनलेली आहे अशीही माहिती त्यांनी या व्हिडिओत दिली आहे.

यानंतर आम्ही सध्या मुंबईतील पोलिस मुख्यालयात डीसीपी म्हणून कार्यरत आयपीएस अधिकारी एन. अंबिका यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ”माझा बालविवाह झालेला नाही. माझे लग्न वयाच्या 19 व्या वर्षी झाले आहे. शालेय आणि ज्युनियर काॅलेजपर्यंतचे शिक्षण लग्नाआधीच पूर्ण झाले आहे”.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, आयपीएस अधिकारी एन. अंबिका यांचा बालविवाह झाला नसून त्यांचे ज्युनियर काॅलेजपर्यंतचे शिक्षण लग्नाआधीच पूर्ण झाले होते. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

Result: Misleading

Our Source

Lokmat- https://www.youtube.com/watch?v=foRf66eDUHs

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular