Saturday, April 20, 2024
Saturday, April 20, 2024

HomeFact CheckViralदुधात भेसळ करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ मुंबईतील नाही, हे आहे सत्य

दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ मुंबईतील नाही, हे आहे सत्य

Authors

दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून हा व्हिडीओ मुंबईच्या जोगेश्वरी येथील तबेल्यातील असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या व्हिडिओत एक व्यक्ती म्हशीची धार काढत असताना दूध पितो व दुधाच्या बकेटमध्ये जवळच्या हौदातील पाणी ओतून भेसळ करत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोस्टमध्ये म्हटले आहे की हा प्रकार मुंबईतील जोगेश्वरी येथील असून पहा मुंबईकर किती शुद्ध दूध पितात आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालून हे दूध त्यांना देखील पाजतात.

https://www.facebook.com/anil.vijaybhumkar/videos/300839081019718

संग्रहित

Fact Check / Verification

आम्ही या बाबत पडताळणी सुरु केली. काही किवर्डसच्या आधारे शोध सुरु केला असता आम्हाला याच दाव्याचे एक ट्विट देखील आढळून आले.

संग्रहित

https://twitter.com/vikaswebexpert/status/1296295822175244288

आम्ही या व्हिडिओतील काही स्क्रिनशाॅट काढून रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता नवभारत टाईम्सच्या बातमीचा व्हिडिओ आढळून आला. दूधात घाण पाणी मिसळण्याचा व्हिडिओ हैद्राबादमधील असल्याचे यात म्हटलेले आहे.

newsmeter.in या वेबसाईटवर देखील यासदंर्भात बातमी प्रसिद्ध झाली आहे. यात म्हटले आहे की, हैद्राबादमधील दाबीरपुरा पोलिसांनी या प्रकरणी 19 आॅगस्ट रोजी डेअरी मालकाला अटक केली आहे. मात्र व्हिडिओत दिसणारा कामगार फरार झाला आहे.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, दुधात घाण पाणी मिसळण्याचा व्हिडिओ हा मुंबईतील जोगेश्वरी तबेल्यातील नाही तर हैद्राबादमधील एका डेअरीतील आहे. हा व्हिडिओ मुंबईच्या नावाने चुकीच्या दाव्यानिशी सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Result- Misleading

Sources

नवभारत टाईम्स- https://www.youtube.com/watch?v=QCV2bP1lcLc

न्यूजमीटर- https://newsmeter.in/watch-dabeerpura-dairy-farm-worker-adulterating-milk-owner-arrested/

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular