Thursday, March 28, 2024
Thursday, March 28, 2024

HomeFact CheckViralरातोरात स्टार बनलेली राणू मंडल पुन्हा रस्त्यावर आलेली नाही, चुकीचा दावा व्हायरल

रातोरात स्टार बनलेली राणू मंडल पुन्हा रस्त्यावर आलेली नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

आपल्या मंजुळ आवाजामुळे रातोरात स्टार बनलेली राणू मंडल पुन्हा रस्त्यावर आली असल्याचा दावा व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये राणू मंडलचा फोटो शेअर केला असून त्यात राणू विदारक अवस्थेत रस्त्यावर उभी असलेली दिसत आहेत. चार दिन की चांदणी.. ही मोठी कलाकार बनली होती. पुन्हा पहिल्यासारखी अवस्था कशी झाली? असा प्रश्न देखील पोस्टमध्ये विचारण्यात आला आहे.

https://twitter.com/humlogindia/status/1331633693970952193

कधीकाळी रेल्वे स्टेशनवर गाणी गात फिरणारी राणू मंडल आपल्या मंजुळ आवाजामुळे सोशल मीडियाच्या माध्यमांतून रातोरात सेलिब्रिटी बनली, बाॅलीवुडमधील चित्रपटात देखील तिने गाणी गायली मात्र तिची अवस्था पुन्हा वाईट झाल्याची व ती रस्त्यावर फिरत असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल आहे. राणू मंडलला खरंच रस्त्यावर फिरण्याची वेळ आली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता सप्टेंबर 2020 मध्ये टाईम्स नाऊ या हिंदी वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, लाॅकडाउनच्या काळात राणू काही गरीब लोकांना मदत करताना एका व्हिडिओत दिसली होती. मात्र आता काम नसल्याने आता तिलाच पैशाची गरज भासत आहे. राणू सध्या जुन्या कमाईवरच उदरनिर्वाह करत आहे. मात्र या बातमीत कुठेही राणूवर भीक मागण्याची पुन्हा वेळ आल्याचे म्हटले नाही किंवा ती रस्त्यावर आल्याचे म्हटलेले नाही.

याशिवाय आम्हाला राणू मंडलविषयी लाईव हिंदुस्तानची बातमी आढळून आली, ज्यात लाॅकडाऊनच्या काळात कोरोनामुळे काम नसल्याने तिची आर्थिक परिस्थिती नाजूक बनल्याचे म्हटले आहे. मात्र यात कुठेही ती रस्त्यावर आल्याचे किंवा भीक मागत असल्याचे म्हटलेले नाही.

अधिक शोध घेतला असता आम्हाला अमर उजालाची बातमी आढळून आली यात राणू सरोजिनी या चित्रपटासाठी सर्व गाणी गाणार असल्याचे म्हटले आहे. टीव्ही शो रामायणातील सीतेच्या भुमिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री दीपिका चिखलिया ‘सरोजिनी’ या चित्रपटात पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू यांची भूमिका करत आहेत.

या चित्रपटातील सर्व गाणी राणू मंडल गाणार असल्याचे चिखलिया यांनी ट्विट करुन सांगितले आहे शिवाय यात राणू मंडलचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, कोरोनामुळे लाॅकडाऊनच्या काळात इतर कलाकारांप्रमाणेच राणू मंडलची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली होती, परंतु ती जुन्या कमाईवर निर्वाह करत होती, तिला भीक मागण्याची वेळ आल्याचा खोटा दावा सोश मीडियात व्हायरल झाला.

Result- Misleading

Our Sources

Times Now- https://www.timesnowhindi.com/entertainment/celebrity-news/article/ranu-mandals-career-became-challenging-without-work-facing-harsh-situation-in-lockdown/314484

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular