Wednesday, September 22, 2021
Wednesday, September 22, 2021
घरFact ChecksWeekly Wrap: पन्नास वर्षातून एकदा उमलणारे ‘ॐ कार पुष्प’ ते मुंबईत ‘बेस्ट’ची...

Weekly Wrap: पन्नास वर्षातून एकदा उमलणारे ‘ॐ कार पुष्प’ ते मुंबईत ‘बेस्ट’ची इलेक्ट्रिक टॅक्सी, आठवडभरात व्हायरल टाॅप फेक दाव्यांचे फॅक्ट चेक

व्हायरल फोटोतील फूल पन्नास वर्षातून एकदा उमलणारे ‘ॐ कार पुष्प’ आहे का?

सोशल मीडियात फुलाचा एक फोटो व्हायरल होत आहे, दावा करण्यात येत आहे की, हा फोटो 50 वर्षातून एकदाच उमलणा-या ॐ कार पुष्प या फुलाचा आहे. ही निसर्गाची अगाध लीला आहे, त्यामुळे हा फोटो केवळ आपल्यापुरता न ठेवता इतरांनाही पाठवा. पण हे सत्य नाही. हे फूल हिमालयात उगवणारे नाही तर परदेशातील आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा

वाघांचा व्हायरल व्हिडिओ महाबळेश्वर-पाचगणी रोडवरील नाही, हे आहे सत्य

रात्रीच्या अंधारात रस्त्यावर आलेल्या दोन वाघांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा करण्यात आला आहे की, हे वाघ 19 आॅगस्ट 2021 रोजीच्या रात्री महाबळेश्वर- पाचगणी रोडवर पर्यचकांच्या गाडी समोर आले होते, त्यावेळी हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे, पण हे सत्य नाही व्हायरल व्हिडिओ जुना आहे. तो महाबळेश्वरचा तर चंद्रपुरजवळील ताडोबा अभयारण्यातील असल्याचे सत्य समोर आले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

संजय राऊत यांनी ‘तालिबान लोकशाहीवर चालणारा समूह’असल्याचे म्हटले आहे?

तालिबानने अफगानिस्तानवर कब्जा केल्यानंतर जगभरातून यावर प्रतिक्रिया उमटल्या. भारतातील अनेक दिग्गजांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अशातच शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी “तालिबान हा लोकशाहीवर चालणारा समूह आहे” असे म्हटल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पण हा दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

काॅंग्रेस नेत्यांच्या बैठकीतील बॅनरवर ‘Chor Group Meeting’ असा उल्लेख करण्यात आला होता का?

सोशल मीडियात सध्या काॅंग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतील बॅनरमुळे सोशल मीडियावर युजर्स उलट सुलट प्रतिक्रिया देत आहेत. या बैठकीत सोनिया गांधी मनमोहन सिंह, राहुल गांधींसह अतर अनेक नेत दिसत आहेत मात्र त्यांच्या मागे असलेल्या बॅनरवर ‘Chor Group Meeting’ असे इंग्रजीत लिहिलेले दिसत आहे. पण हे सत्य नाही. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

मुंबईत ‘बेस्ट’ने इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरु केली आहे का?

मुंबईत बेस्ट ने इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरु केलेली असल्याच्या दाव्याने एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत एक लाल रंगाची कार असून कारच्या बाजुला खाकी गणवेश परिधान केलेला व्यक्ती ही उभा आहे. तसेच कार वर बेस्टचा लोगो लावलेला असून ड्रायव्हरच्या दरवाजावर BEST ELECTRICK TAXI असे लिहिले आहे. पण हे स्तय नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular