Tuesday, April 16, 2024
Tuesday, April 16, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: सिंगापूर कोरोना मृताचे पोस्टमार्टम करणारा पहिला देश ते महावितरणचे नवीन...

Weekly Wrap: सिंगापूर कोरोना मृताचे पोस्टमार्टम करणारा पहिला देश ते महावितरणचे नवीन प्रीपेड मीटर,आठवडभरात व्हायरल टाॅप फेक दाव्यांचे फॅक्ट चेक

Authors

सोशल मीडिया हे असे एक माध्यम आहे जेथे दररोज फेक न्यूज मोठ्या प्रमाणात शेअर होतात. सोशल मीडिया युजर्स दिशाभूल करणारी किंवा चुकीची माहिती शेअर करताना दिसतात. या आठवड्यात असेच काही घडले.सिंगापूर हा कोविड मृताचे पोस्टमार्टम करणारा पहिला जगातील देश असून कोविड हा बैकटेरिया असल्याचे सिद्ध केल्याचा दावा व्हायरल झाला तर महावितरणने नवीन प्रीपेड मीटर लाॅंच केल्याचा दावा देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमच्या टीमने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे आणि त्यांचे सत्य आपल्यासमोर मांडले आहे.

सिंगापूरने WHO च्या नियमांविरुद्ध कोरोना रुग्णाचे पोस्टमार्टम करुन जगापुढे सत्य आणले?

सिंगापूरने WHO च्या नियमांविरुद्ध कोरोना रुग्णाचे पोस्टमार्टम करुन जगापुढे सत्य आणल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, “कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करणारा सिंगापूर जगातील पहिला देश बनला आहे. पण हे सत्य नाही.सिंगापूर सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बेळगाव महानगरपालिकेत भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना पेढा भरविला

बेळगाव महानगरपालिकेत भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना पेढा भरविला असल्याच्या दाव्याने एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेढा भरवत असल्याचे दिसते. पण हा फोटो दोन वर्षापुर्वीचा असल्याचे आमच्या पडताळणी स्पष्ट झाले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आदित्य ठाकरेंचे उर्दूमधील होर्डिंग झाले व्हायरल, काय आहे सत्य?

आदित्य ठाकरेंचे उर्दूमधील होर्डिंग व्हायरल झाले आहे. या फोटोवरुन सोशल मीडियात शिवसेना आणि उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मराठी अस्मिता वगैरे वगैरे…. असे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे. पण हा फोटो सध्याचा नाही तर दोन वर्षापूर्वीचा असल्याचे आमच्या पडताळणीत ाडलून आले. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महावितरणने नवीन प्रीपेड वीज मीटर लाॅंच केला आहे का?

महावितरणने नवीन प्रीपेड वीज मीटर लाॅंच केला असल्याच्या दाव्याने सोशल मीडियात एक मीटरचा फोटो व्हायरल होत आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यात लवकरच प्रीपेड मीटर महावितरण ग्राहकांना देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांतच सोशल मीडियावर प्रीपेड मीटरचा फोटो व्हायरल झाला आहे. पण हा महावितरणचा नवा मीटर नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular