Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: महाराष्ट्रात 1 मार्चपासून लाॅकडाऊन ते संजय राठोडसोबत चित्रा वाघ यांचा...

Weekly Wrap: महाराष्ट्रात 1 मार्चपासून लाॅकडाऊन ते संजय राठोडसोबत चित्रा वाघ यांचा आक्षेपार्ह फोटो

Authors

या सप्ताहात Newschecker.in ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे पुन्हा एकदा 1 मार्चपासून लाॅकडाऊन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यची बातमी व्हायरल झाली. तसेच टिकटाॅक स्टार समीर गायकवाड पाठोपाठ त्याच्या प्रेयसीने देखील आत्महत्या केल्याचा दावा व्हायरल झाला आहे.

याशिवाय इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.

महाराष्ट्रात 1 मार्च पासून लाॅकडाऊन केला जाणार असल्याचा खोटा स्क्रीनशाॅट व्हायरल 

कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या पाहता महाराष्ट्रात एक मार्च पासून लाॅकडाऊन केला जाणार असल्याच्या बातमीचा स्क्रीनशाॅट सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  1 मार्च 2021 पासून संपूर्ण राज्यात 15 दिवसांचा कडक लाॅकडाऊन असा मजकूर लिहिण्यात आला आहे. पण हे सत्य नाही. टिव्ही 9 मराठीच्या नावाने खोटा स्क्रीनशाॅट व्हायरल झाला आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

व्हायरल व्हिडिओ हैद्राबादमधील मेट्रो पुलाचा नाही, हे आहे सत्य

सोशल मीडियात सध्या एका पुल पडून त्या खाली अनेक गाड्या दबल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, दावा करण्यात येत आहे की हा व्हिडिओ हैद्राबादमधील मेेट्रो पुलाचा आहे. तसेच दुसरा दावा असाही करण्यात येत आहे की हैद्राबादमधील बालानगर भागातील हा फ्लायओव्हर असून यात अनेक गाड्या दाबल्या गेल्या आहेत. पण हे सत्य नाही. व्हायरल फोटो हा वारणसीतील फ्लायओव्हरचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

समीर गायकवाड पाठोपाठ त्याच्या प्रेयसीने आत्महत्या केली नाही, व्हायरल झाला चुकीचा दावा

टिकटाॅक स्टार समीर गायकवाड याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या प्रेयसीने देखील आत्महत्या केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.समीर गायकवाड पाठोपाठ त्याच्या प्रेयसीने आत्महत्या केली, त्यांच्या खऱ्या प्रेमाला सलाम अशा आशयाचा मेसेज सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा संजय राठोड सोबत फोटो, हे आहे सत्य

पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यू वादात अडकलेले महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा फोटो व्हायरल होत आहे. चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनंतर दुस-या दिवशी संजय राठोड आणि चित्रा वाघ यांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे आणि यात चित्रा वाघ यांना आता आम्ही काय समजायचं असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे.  याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular