या सप्ताहात Newschecker.in ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. पंतप्रधा नरेंद्र मोदी आणि सचिन तेंडुलकरचा एक फोटो व्हायरल होत झाला आहे या फोटोत भिंतीवर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा फोटो दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की, पंतप्रधान कार्यालात अंबानींचा फोटो लावण्यात आला आहे. याशिवाय अमेरिकेने भारताला जीएसपी यादीत स्थान दिल्याचा दावा तसेच मंचर पोलिसांकडून तरुणाला मारहाण व ओडिशातील सिमलीपाल राष्ट्रीय अभयारण्यात लागलेल्या आगीचे फोटो देखील व्हायरल झाले
याशिवाय इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सचिन तेंडुलकर यांचा एडिटेड फोटो व्हायरल, हे आहे सत्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या फोटोत सचिनच्या मागे भिंतीवर मुकेश आणि नीता अंबानी यांचा फोटो दिसत आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांचा फोटो पंतप्रधान कार्यालयात आहे असा दावा युजर्स करत आहेत. पण हे सत्य नाही. पंतप्रधान कार्यालयात मुकेश अंबानी आणि त्यांच्या नाही. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
अमेरिकेने भारताला GSP यादीत स्थान दिलेले नाही, व्हायरल झाला चुकीचा दावा
सोशल मीडियात सध्या एक संदेश सामायिक केला जात आहे, असा दावा करण्यात आला आहे की अमेरिकेतील जो बायडन प्रशासनाने Generalized System of Preferences (GSP) कार्यक्रमांतर्गत लाभार्थी विकसनशील देशांच्या यादीत भारताचा देखील समावेश केला आहे. पण हे सत्य नाही अमेरिकेने असा निर्णय घेतलेला नाही. याचे संपूर्ण फॅक्ट इथे वाचा.
पोलिसांनी तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ मागील वर्षीचा, आताचा म्हणून होतोय व्हायरल
दावा करण्यात येत आहे की राज्यात काही ठिकाणी लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे तसेच ब-याच ठिका निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. अशातच मंचरमधील एक तरुण आपल्या आईवडिलांना शेतात डबा घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला अमानुष मारहाण केली असल्याच्या दाव्याने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मागील वर्षीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
ओडिशातील सिमलीपाल व्याघ्रप्रकल्पातील आगीदरम्यानचे नाहीत व्हायरल फोटो, हे आहे सत्य
मागील दोन आठवड्यापासून ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. या भीषण आगीत प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याच दरम्यान सोशल मीडियात या आगीचे फोटो देखील व्हायरल होत आहे. आम्हाला हे फोटो सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म फेसबुक आणि व्हाट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. पण नाहीत. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
पोस्ट खातेधारकांकडून व्यवहारांवर शुल्क आकारणी करणार असल्याचा दावा, हे आहे सत्य
पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी 1 एप्रिल 2021 पासून व्यवहारांवर शुल्क आकारणी संदर्भात नियम लागू होणार आहेत. नव्या नियमांनुसार, पैसे काढण्यासाठी आणि डिपॉजिटसाठी शुल्क आकारणी लागू होईल आणि ही रक्कम पोस्ट ऑफिसमधील ग्राहकांच्या खात्याच्या स्वरुपानुसार बदलू शकते. पण हे सत्य नाही सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.