Sunday, May 9, 2021
Sunday, May 9, 2021
घरFact ChecksWeekly Wrap: आदित्य ठाकरेंना HIV ची लागण ते बीडमध्ये लाॅकडाऊनविरोधात जनता रस्त्यावर

Weekly Wrap: आदित्य ठाकरेंना HIV ची लागण ते बीडमध्ये लाॅकडाऊनविरोधात जनता रस्त्यावर

या सप्ताहात Newschecker.in ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना एचआयव्हीची लागण झाल्याचा दावा व्हायरल झाला आहे. याशिवाय सामान्य नागरिकांना कोराना संदर्भात कोणतीही माहिती ग्रुपमध्ये शेअर करण्यास मनाई करण्यात आल्याची पोस्ट तसेच शेतकरी नेते राकेश टिकेत यांना ओडिशात मारहाण झाल्याचा दावा देखील व्हायरल झाला. बीडमध्ये लाॅकडाऊनच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

याशिवाय इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.

आदित्य ठाकरे HIV/AIDS पाॅझिटिव्ह नाहीत, बातमीचा खोटा स्क्रीनशाॅट व्हायरल

हाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे HIV/AIDS पाॅझिटिव्ह असल्याच्या बातमीचा स्क्रीनशाॅट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. फेसबुक आणि ट्विटरवर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आमच्या एका वाचकाने आम्हाला व्हाट्सअॅपर हा स्क्रीनशाॅट पाठविला पण व्हायरल होत असलेला दावा खरा नाही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

COVID-19 संदर्भात बातमी शेअर करण्यास मनाई करण्यात आलेली नाही, चुकीचा दावा व्हायरल

देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असून यानुसार COVID-19 संदर्भात कोणतीही बातमी किंवा विनोद शेअर करण्यास मनाई करण्यात आली आहे. फक्त सरकारी संस्थाच कोरोनाविषयी माहिती शेअर करु शकतील असा दावा सध्या सोशळ मीडियात व्हायरल होत आहे. पण हे सत्य नाही. सरकारने असा कोणताही आदेश दिलेला नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

तेलंगणातील अल्पसंख्यक नेते फिरोज खान यांनी भाजपात प्रवेश केलेला नाही,चुकीची बातमी व्हायरल

तेलंगणातील काॅंग्रेसते अल्पसंख्यक नेते फिरोझ खान यांनी भाजपात प्रवेश केला असल्याच्या बातम्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यात म्हटले आहे की असुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात निवडणुक लढविलेलेल काॅंग्रेस नेते फिरोज खान यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. यासंदर्भातील अनेक पोस्ट सोशल मीडियात पाहायला मिळत आहेत. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅकट चेकिंग इथे वाचा

शेतकरी नेते राकेश टिकेत यांना ओडिशात मारहाण झालेली नाही, चुकीचा दावा व्हायरल

शेतकरी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे शेतकरी नेते राकेश टिकेत हे देशभरातील शेतकरी महापंचायतींमध्ये सामील होत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, यात असा दावा केला जात आहे की ओडिशामध्ये राकेश टिकेत यांना मारहाण केली गेली. टिकेत महापंचायतीत सहभागी होण्यासाठी ओडिशा येथे गेले होते. पण हे अर्धसत्य आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

बीडमध्ये लाॅकडाऊनचा विरोध करत जनता रस्त्यावर उतरलेली नाही,मैसुरुमधील व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल

सोशल मीडियात सध्या बीडमध्ये लाॅकडाऊनचा विरोध करत जनता रस्त्यावर उतरल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण व्हायरल होणारा व्हिडिओ बीडमधील नाही तर कर्नाटकमधील आहे. याचे संपूर्ण फॅक्ट इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular