Wednesday, April 24, 2024
Wednesday, April 24, 2024

HomeFact CheckWeekly Wrap : कोरोना व्हायरस संदर्भात सप्ताहभरातील व्हायरल दाव्यांचे फॅक्ट चेक

Weekly Wrap : कोरोना व्हायरस संदर्भात सप्ताहभरातील व्हायरल दाव्यांचे फॅक्ट चेक

Authors

या सप्ताहात Newschecker.in ने सोशल मीडियात कोरोना व्हायरस संदर्भात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. आंध्रप्रदेशमात कोरोना रुग्णांना सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांत मोफत उपचार मिळणार असल्याचा दावा व्हायरल झाला. या शिवाय बिहारच्या बक्सर जिल्ह्यात गंगा नदीत 150 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचे मृतदेह वाहून आल्याचे फोटो देखील व्हायरल झाले. तसेच दारुच्या काढ्याने कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा आणि 5जी ट्रायलमुळे मानवी जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा देखील शेअर होत आहे.

याशिवाय इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.

आंध्रप्रदेशात कोरोना रुग्णांवर खाजगी हाॅस्पिटलमध्ये मोफत उपचार? 

अनेक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या म्हटले आहे की, आंध्रप्रदेशात सरकारी तसेज खाजगी रुग्णालयात कोरोनावर मोफत उपचार राज्य सरकारचा निर्णय… म्हणे महाराष्ट्र विकासात देशात प्रथम. महाराष्ट्र सरकार याचा आदर्श घेईल का? पण हे अर्धसत्य आहे. केवळ आर्थिक दुर्बल घटकांनाच सरकारी तसेच काही खाजगी रुग्णालयांत मोफत उपचार मिळत आहेत. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील प्रेतांचे नाहीत व्हायरल फोटो, वाचा सत्य

बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गंगा नदीत 150 प्रेते वाहून आल्याच्या दाव्याने काही फोटो सोशल मीडियात शेअर होत आहेत. यात प्रेते पाण्यावर तरंगताना दिसत आहेत तर कावळे आणि कुत्रे त्यांचे लचके तोडताना दिसत आहेत. दुस-या एका फोटोत ही प्रेत ओढण्यासाठी जेसीबी मशीन लावण्यात आल्याचे दिसते. पण हे फोटो 6 वर्षापूर्वी गंगा नदीत वाहत असलेल्या मृतदेहांचे असल्याचे आढळून आले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

देशी दारुच्या काढ्याने कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा डाॅक्टरचा दावा, जाणून घ्या सत्य

अहमदनगर जिल्ह्यातील एका डाॅक्टरने देशी दारुच्या काढ्याने कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा दावा केला आहे. त्याने म्हटले आहे की त्याने आतापर्यंत 25 कोरोना रुग्णांना बरे केले आहे. डाॅक्टरच्या या दाव्याची राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी देखील दखल घेतली आहे. तसेच सोशल मीडियात देखील या दाव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. पण हा दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

5G ट्रायलमुळे मानवी जीवितासाठी धोका? मोबाईल बंद ठेवण्याची सुचना देणा-या मेसेजचे हे आहे सत्य

5G ट्रायलमुळे मानवी जीवितासाठी धोका असल्याची व मोबाईल बंद ठेवण्याची सुचना देणारा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.या ट्रायल दरम्यान लहान मुलांच्या हाती मोबाईन न देण्याची तसेच मोबाईल बंद ठेवण्यास सांगितले आहे. हे करणे आपल्या कुटूंबासाठी चांगले असल्याचे म्हटले आहे.  पण या मेसेजेमध्ये काही तथ्य नसल्याचे आढळले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular