Thursday, March 28, 2024
Thursday, March 28, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: अटल बोगद्यापासून ते उद्धव ठाकरेंच्या व्हायरल फोटोपर्यंत, या आहेत टाॅप...

Weekly Wrap: अटल बोगद्यापासून ते उद्धव ठाकरेंच्या व्हायरल फोटोपर्यंत, या आहेत टाॅप फेक न्यूज

Authors

या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्गाटन केलेल्या जगातील सर्वात लांब अटल बोगद्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिपब्लिक भारत न्यूज चॅनल पाहत असल्याचा दावा देखील व्हायरल झाला हे सगळे दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला फोटो अटल बोगद्याचा असल्याचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच उद्घाटन केलेल्या अटल बोगद्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. पोस्टमधील दाव्यानुसार हा फोटो अटल बोगद्याचा असून जगातील सर्वात लांब 9.02 किमी बोगदा असल्याचे म्हटले आहे. पडताळणीत हा फोटो कॅलिफोर्नियातील डेविल्ड स्लाईट टनेलचा असल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा

महाराष्ट्र सरकारने रात्रीच्या वेळी एकट्या महिलांसाठी मोफत वाहनाची सुविधा सुरु केल्याचा दावा

महाराष्ट्र सरकारने एकट्या महिलांसाठी मोफत वाहनाची सुविधा सुरु केली असल्याचा मॅसेज सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, यात महिलांना मदतीसाठी एक हेल्पलाईन नंबर देखील शेअर करण्यात आला आहे. पडताळणीत महाराष्ट्र सरकारने अशी सुविधा सुरु केली नसल्याचे व व्हायरल हेल्पलाईन नंबर लुधियाना पोलिसांचा असल्याचे आढळले. संपूर्ण फॅक चेक इथे वाचा.

मोबाईल चार्जिंगला लावून बोलल्याने मुलाचा मृत्यू झाला असल्याचा दावा

मोबाईल चार्जिंगला लावून बोलल्याने मुलाचा मृत्यू झाला असल्याच्या दाव्याने धडापासून डोेके वेगेळे झालेल्या रंक्तबंबाळ मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये मोबाईल चार्जिंगला लावून बोलू नका तसेच तुमच्याकडे जेवढे काॅन्टॅक्ट्स आणि ग्रुप असतील त्या सर्वांना ही बातमी पाठवा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. पण पडताळणीत वेगळेच सत्य समोर आले. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिपब्लिक न्यूज चॅनल पाहत असल्याचा फोटो व्हायरल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिपब्लिक न्यूज चॅनल पाहत असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. उपहासात्मक पोस्टमध्ये म्हटले आहेकी, अर्णव गोस्वामीकडून 500 रुपये घेऊन रिपब्लिक न्यूज पाहत असलेला भारतीय गरीब. मुख्यमंत्री पंतप्रधानाशी व्हिडिओ काॅन्फरन्स करतानाचा मूळ फोटो एडिट केला आहे. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular