Thursday, September 16, 2021
Thursday, September 16, 2021
घरFact ChecksWeekly Wrap : राहुल गांधींची इटलीत अब्जावधींची इमारत ते ठाकरे सरकारची दर्ग्यात...

Weekly Wrap : राहुल गांधींची इटलीत अब्जावधींची इमारत ते ठाकरे सरकारची दर्ग्यात सलामीची परंपरा

या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. राहुल गांधींनी भारताची संपत्ती लुटून इटलीत अब्जावधींची इमारत खरेदी केल्याचा दावा व्हायरल झाला तर दुसरीकडे विराट आणि अनुष्काचा त्यांच्या मुलीसोबतचा फोटो देखील व्हायरल झाला. याशिवाय ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांची दर्ग्यात सलामी देण्याची परंपरा सुरु केल्याचा दावा देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हे आणि इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.

राहुल गांधींनी भारताची संपत्ती लुटून इटलीमध्ये अरबो रुपयांची बिल्डिंग खरेदी केल्याचा दावा

राहुल गांधींनी भारताची संपत्ती लुटून इटलीमध्ये अरबो रुपयांची बिल्डिंग खरेदी केल्याचा दावा सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक व्यक्ति हिंदीतून माहिती देत आहे, मैं इटली से एक हिंदुस्तानी बोल रहा हूं यह राहुल गांधी की बिल्डिंग है जो करोड़ों की नहीं बल्कि अरबों रुपए की है. परंतु हे सत्य नाही. ती जागतिक ठेवा असलेली वास्तु आहे.याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

व्हायरल फोटो बदायू सामूहिक बलात्कार पीडितेचा असल्याचा दावा

बदायू सामूहिक बलात्कार पीडितेचा म्हणून सोशल मीडियावर एका मृत महिलेचा फोटो व्हायरल होत आहे. ही पोस्ट हिंदीत असून यात म्हटले आहे की, बदायू सामूहिक बलात्कार प्रकरण, मंदिरात गेलेल्या 50 वर्षीय महिलेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. सामूहिक बलात्काराच्या वेळी घडलेल्या भयानक गोष्टी एकून थरकाप उडेल. पण पडताळणीत हा फोटो बदायू पीडितेचा नसल्याचे आढळले. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा मुलीसोबतचा फोटो व्हायरल

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा त्यांच्या मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. अनुष्काने नुकताच मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर विराट आणि अनुष्काचा त्यांच्या मुलीचा फोटो सोशल मीडियात शेअर होत आहे तसेच दोघांचे अभिनंदन देखील केले जात आहे पण, व्हायरल फोटो विराट आणि अनुष्काचा आपल्या बाळासोबतचा नाही, करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा दहा वर्षापूर्वी त्यांच्या मुलासोबत काढलेला फोटो माॅर्फ करण्यात आला आहे.याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

मशिदीत नमाज पठण करणा-या शीख तरुणाचा फोटो शेतकरी आंदोलनादरम्याच असल्याचा दावा

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित अनेक दावे व्हायरल होत आहे. असाच एक दावा सोशल मीडियात शेअर होत आहे. यात एका मशिदीत मुस्लिम बांधवांसोबत शीख युवक नमाज पठण करतानाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. पण हा तरुण मुस्लिम नाही आणि हा फोटो आताचा देखील नाही. हा फोटो चार वर्षांपूर्वीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

ठाकरे सरकारने मकदूम शाह दर्ग्यावर सलामी देण्याची परंपरा सुरू केल्याचा दावा

मुंबई पोलिसांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात पोलिस पीर हजरत मकदूम शाह दर्ग्यावर सलामी देताना दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात सलामीची ही परंपरा सुरु झाली आहे. पण हे सत्य नाही. मुंबई पोलिसांकडून काही वर्षांपासून माहिमच्या दर्ग्यात चादर चढविली जात आहे. ही पंरपरा ठाकरे सरकारने सुरु केलेली नाही. फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular