या सप्ताहात Newschecker.in ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. पत्नीच्या निधनानंतर बाळाला घेऊन काॅलेजमध्ये ज्ञानदानाचे काम करणा-या प्राध्यापकाचा फोटो व्हायरल झाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल दरवाढीवर प्रश्न विचारणा-या मराठी व्यक्तीला गप्प बसविल्याचा दावा देखील व्हायरल झाला. याशिवाय नितीन गडकरींनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. याशिवाय इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.
फोटोतील बाळ त्या प्राध्यापकाचे नाही, चुकीचा दावा व्हायरल
सोशल मीडियात सध्या एका प्राध्यापकाचा बाळ पोटाशी धरुन विद्यार्थ्यांना शिकवतानाचा फोटो व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की फोटोतील बाळ त्या प्राध्यापकाचे आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, या प्राध्यापकांची पत्नी बाळाला जन्म देताना निधन पावली. पण हे सत्य नाही. प्राध्यापकाबाबत व्हायरल होत असलेला दावा भ्रामक आहे. ते बाळ प्राध्यापकाचे नसून त्याच्या 22 वर्षीय विद्यार्थिनीचे आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा
पेट्रोल दरवाढीबाबत प्रश्न विचारल्यावर मोदींनी मराठी माणसाला चूप बसविले
पंतप्रधान मोदी व्हिडिओ काॅन्सफरन्सदरम्यान हरिभाऊ नावाच्या व्यक्तीशी मराठीत बोलताना दिसत आहेत. पंतप्रधान त्या व्यक्तीला हरिभाऊ बोला काय म्हणता असे मराठीत विचारतात, त्यावर तो व्यक्ती उठून उभा राहतो आणि म्हणतो की, राम राम ते पेट्रोलचे भाव वाढले, यावर मोदी त्याला बसा बसा असे सांगत आहेत. पण हे सत्य नाही. मुद्रा योजनेच्या लाभार्थ्याची क्लिपए एडिट करण्यात आली आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
शरद पवारांना थप्पड लगावल्याचा व्हिडिओ 10 वर्षांपूर्वीचा, चुकीचा दावा व्हायरल
शरद पवारांना थप्पड लगावल्याचा व्हिडिओ सध्याचा असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हिंदीतील पोस्टचा आम्ही अनुवाद केला. यात म्हटले आहे की, खलिफा विरोधात बोलणा-या सचिन तेंडुलकरला सल्ला देणारे शरद पवार यांना कुणीतरी थप्पड लगावली, पवार देखील आता केजरीवाल यांच्या रेसमध्ये आले. पण हा व्हिडिओ जुना आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात वक्तव्य केले
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात गडकरी आंदोलन करण्यास सर्वांना संविधानिक अधिकार आहे असे सांगत आहेत. त्यांच्यासोबत सध्याचे रविशंकर प्रसाद देखील दिसत आहेत. पण हा व्हिडिओ दहा वर्षापुर्वीचा आहे. गडकरी तेव्हा काॅंग्रेसला उद्देश्यून बोलत होते. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
व्हायरल व्हिडिओतील आत्महत्या करणारा इसम शेतकरी नाही, जाणून घ्या सत्य
वीजेच्या ट्रांसफार्मरला कवटाळून आत्महत्या करणारा इसम शेतकरी असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात एक इसम ट्रांस्फार्मरवर चढलेला दिसत आहे तर खालून काही लोक त्याला आवाज देत आहेत. पण तो कुणाचेच एेकत नाही, तो ट्रांसफार्मरचा खटका हाताने ओढतो त्यावेळी जाळ निर्माण होतो आणि इसम खाली फेकला जातो. पण हा शेतकरी नाही तर आर्मीचा जवान आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.