Saturday, April 20, 2024
Saturday, April 20, 2024

HomeFact CheckWeekly Wrap : हिंदू तरुणाचा मुस्लिम तरुणीशी विवाह ते पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन

Weekly Wrap : हिंदू तरुणाचा मुस्लिम तरुणीशी विवाह ते पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन

Authors

या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. हिंदू युवकाने मुस्लिम युवतीशी लग्न केल्याच्या दाव्याने एक फोटो शेअर होत आहे, तसेच केंद्र सरकाराने अडीच लाखांपेक्षा जास्त वृत्तपत्रांची शीर्षकं रद्द केल्याचा दावा व्हायरल झाला आहे, तसेच कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने पुण्यात पुन्हा 15 दिवसांचा लाॅकडाऊन करणार असल्याचा व इतर इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज वाचू शकता.

हिंदू युवकाने मुस्लिम युवतीशी लग्न केल्याचा दावा व्हायरल

हिंदू युवकाने मुस्लिम युवतीशी लग्न केल्याचा दावा व्हायरल झाला आहे. समाजमाध्यमांत एका युवकाचा आणि युवतीचा फोटो व्हायरल होत आहे. यात युवकाच्या कपाळावर टिळा लावलेला दिसत आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या युवतीने हिजाब घातला आहे. दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडलेले दिसत आहेत. युवक हिंदू असून युवती मुस्लिम असल्याचा दावा केला जात आहे. पडताळणीत हा दावा चुकीचा असल्याचे आढळून आले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

केंद्र सरकारने अडीच लाखांपेक्षा अधिक वृत्तपत्रांची शीर्षकं रद्द केल्याचा दावा व्हायरल

केंद्र सरकारने अडीच लाखांपेक्षा अधिक वृत्तपत्रांची शीर्षकं रद्द केली व शेकडो वृत्तपत्रांना डीएव्हीपीच्या यादीतून काढून टाकल्याच्या बातम्या समाजमाध्यमांत व्हायरल झाल्या आहेत. यात म्हटले आहे की, मोदी सरकारने एक वर्षाच्या तपासानांतर अडीच लाखांहून अधिक वर्तमानपत्रांची शीषर्के रद्द केली आहेत. पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. याविषयीचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

गृह मंत्रालयाने 31 डिसेंबरपर्यंत देशातील शाळा, काॅलेज बंद ठेवण्याचा आदेश 

गृह मंत्रालयाने 31 डिसेंबरपर्यंत देशातील शाळा, काॅलेज बंद ठेवण्याचा आदेश दिला असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, गृहमंत्रालयाने मोेठा निर्णय घेतला असून देशभरातील शाळा आणि काॅलेजेस 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पडताळणीत देशातील शाळा, काॅलेज बंद ठेवण्याचा आदेश दिलेला नाही, सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल झाल्याचे आढळले. संपूर्ण फॅक्ट चेकिंग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

रातोरात स्टार बनलेली राणू मंडल पुन्हा रस्त्यावर आली असल्याचा दावा व्हायरल

पोस्टमध्ये राणू मंडलचा फोटो शेअर केला असून त्यात राणू विदारक अवस्थेत रस्त्यावर उभी असलेली दिसत आहेत. चार दिन की चांदणी.. ही मोठी कलाकार बनली होती. पुन्हा पहिल्यासारखी अवस्था कशी झाली? असा प्रश्न पोस्टमध्ये विचारण्यात आला आहे. पडताळणीत राणू मंडलची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली होती, परंतु ती जुन्या कमाईवर निर्वाह करत होती, तिला भीक मागण्याची वेळ आल्याचा दावा खोटा असल्याचे आढळले. फॅक्ट चेकिंग इथे वाचा

पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार असल्याची बातमी व्हायरल

पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. टिव्ही9 मराठी या वृत्तवाहिनीच्या बातमीची 30 सेकंदाची क्लिप व्हाटसअप्पवर शेअर करण्यात येत आहे.यात म्हटले आहे की, पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून 15 दिवस लाॅकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. जुन्या बातमीची व्हिडिओ क्लिप आत्ताची म्हणून व्हायरल होत आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular