Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeFact CheckWeekly Wrap : बेंगलुरुत शेतक-यांचे सुपरमार्केट ते अंबानींच्या पार्टीत कोरोना नियमांचे...

Weekly Wrap : बेंगलुरुत शेतक-यांचे सुपरमार्केट ते अंबानींच्या पार्टीत कोरोना नियमांचे उल्लंघन

Authors

या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. बेंगलुरु मध्ये शेतक-यांनी आपले सुपरमार्केट तयार केले आहे असा दावा शेतकरी आंदोलना दरम्यान व्हायरल झाला तर सांगलीतील विट्यात मुले पळवणारी टोळी आल्याचा दावा देखील व्हायरल झाला याशिवाय फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग हा भगवी वस्त्रे घालून पंतप्रधान नरेद्र मोदींसोबत बसल्याचा फोटो व्हायरल झाला. इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज वाचू शकता.

बेंगलुरुत शेतक-यांनी स्वत:चे सुपर मार्केट सुरु केले असल्याचा दावा

बेंगलुरुत शेतक-यांनी स्वत:चे सुपर मार्केट सुरु केले असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, बेंगलुरू कर्नाटकात शेतकऱ्यांनी सुरू केले स्वतःचे फळ, भाजींचे स्वतःचे सुपर मार्केट शेतातील माल डायरेक्ट ग्राहका कडे. आता असेच केले पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच पुढे आले पाहिजे.  दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान हा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पणे हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा

व्हायरल फोटोतील मुलगी शेतकरी आंदोलनादरम्यान जेवण वाढत असल्याचा दावा

एक लहान मुलगी हातात रोट्यांनी भरलेली प्लेट घेऊन उभी आहे तिच्या मागे पंगत बसलेली दिसत आहे. दावा करण्यात येत आह की, मुलगी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान सुरु असलेल्या लंगरमध्ये जेवण वाढत आहे. भक्तांना या लहान मुलीचा द्वेष करण्याचे कारण सापडले आहे. पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

सांगलीतील विट्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याचा मॅसेज व्हायरल

विट्यामध्ये दोन फासेपारध्यांना अटक केली असून, त्यांनी कबूल केले आहे की, ते एक दोन तीन नसूनच तीन हजार आहेत. मध्यप्रदेश आणि गडचिरोली या भागातून ते आले आहेत. तीन चार वर्षांच्या मुलांना ते पळवून नेतात. आपल्या गावात शंकास्पद व्यक्ती वाटल्यास त्वरीत जवळच्या पोलिस स्टेशनला संपर्क साधा. असा मॅसेज व्हाट्सअप वर शेअर होत आहे. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मार्क झुकरबर्गचा भगव्या कपड्यातील फोटो व्हायरल

पोस्टमध्ये म्हटले आहे की, शेतक-यांचा आंदोनलाविरोधातल्या गुन्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गची देखील साथ आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान #FacebookJioAgainstFarmers हा ट्रेंड सुरु झाला, याच दरम्यान मार्क झुकरबर्गचा पंतप्रधान मोदींसोबतचा भगवा कपड्यातील फोटो व्हायरल झाला आहे. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

अंबानींनी नातू जन्मल्याच्या आंनदात दिलेल्या पार्टीत कोराना नियमाचे उल्लघंन झाल्याचा दावा

मुकेश अंबानींनी नातू जन्मल्याच्या आंनदात दिलेल्या पार्टीत मुख्यमत्र्यांसह सेलिब्रिटींकडून उल्लघंन झाल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मुकेश अंबांनी यांना नातू झाला. या आनंदात आयोजित पार्टीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सेलिब्रिटी मंडळी सुद्धा सामील झाले होते. असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular