Sunday, May 9, 2021
Sunday, May 9, 2021
घरMarathiअबुधाबीच्या क्राऊन प्रिन्सने केला नाही 'जय सियाराम' चा जप, सोशल मिडियात व्हायरल...

अबुधाबीच्या क्राऊन प्रिन्सने केला नाही ‘जय सियाराम’ चा जप, सोशल मिडियात व्हायरल झाली भ्रामक व्हिडिओ क्लिप

Claim

अबुधाबीतील क्राऊन प्रिन्सने जय सिया राम नावाचा जप केला, मुस्लिम महिलने रामायण डोक्यावर घेतले. लाखो हिंदुंसाठी पुजनीय प्रभू श्रीरामाची जगभरात अशा प्रकारे पुजा केली जाते. 

 
 
 
 
 
व्हेरिफिकेशन–  
 
Geetika Swami नावाच्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात एक मुस्लिम महिला आपल्या डोक्यावर रामायण ग्रंथ घेऊन जाताना दिसत आहे. तिच्या आणखी काही अरबी लोग दिसत आहेत तसेच प्रसि्ध रामचरितमानस कथाकार मोरारी बापू देखील दिसत आहेत. या व्हिडिओसंबंधी दावा करण्यात येत आहे कि अबुधाबीतील क्राउन प्रिन्स यांनी जय सिया रामचा जप केला शिवाय मुस्लिम महिलेने रामायण ग्रंथ देखील डोक्यावर घेतला.
 
 
 
आम्हाला याच दाव्याचा एक व्हिडिओ युट्यूब वर मिळाला
 
 
 
याशिवाय आम्हाला हा व्हिडिओ एका फेसबुक पोस्टमध्ये आढळून आला, मात्रा या पोस्टमधील दावा थोडासा वेगळा होता. 
 
 
या व्हिडिओमध्ये रामचरितमानस कथाकार मोरारी बापू दिसत असल्याने आम्ही खोलात जाऊन व्हिडिओसंबंधी माहिती मिळवण्याचे ठरविले. गुगलवर काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता एक वर्षापूर्वीचे ट्विट आढळून आले. ट्विटमध्ये म्ह्टले आहे की अबुधाबीचे आदरणीय सुलतान शेख मोहम्मद यांनी भगवान शिव मंदिर बांधले आणि मुरारी बापूंना उद्घाटनासाठी आमंत्रित केले, सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या पत्नीला मंदिरात पवित्र रामायण आपल्या डोक्यावर घ्यायला लावले.
 
 
 
 
आम्ही काही किवर्ड्सच्या मदतीने शोधला घेतला असता अबुधाबीचे क्राऊन प्रिंस शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी जय सिया राम नामाचा जप केल्याची बातमी कुठेही आढळून आली नाही. शोध सुरु ठेवला असता मोरारी बापू यांच्या अधिकृत युटयूब अकाउंटवर ओरिजनल व्हिडिओ आढळून आला. 
 
 
 
हा व्हिडिओ बारकाईने पाहिला असता असे आढळून आले की  रामकथेत सहभागी आणि जय सिया रामचा जप करणारी व्यक्ती ही अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान नसून युएईचे प्रसिद्ध स्तंभकार पत्रकार  सुल्तान सूद अल कासेमी हे आहेत। या व्हिडिओत एक वक्ता कार्यक्रमात उपस्थित अतिथींची यादी वाचतो, या यादीत क्राऊन प्रिन्स यांचे नावाच्या घोषणा केली गेली नाही शिवाय ते कार्यक्रमात सहभागी लोकांच्या कुठल्याच रांगेत दिसून आले नाहीत. 
 
 
यावरुन स्पष्ट होते की कार्यक्रमात अबुधातीचे सुलतानांनी नाही तर पत्रकार :सुल्तान सूद अल कासेमी यांनी जय सियाराम जप केला होता तसचे दुसरा दावा देखील भ्रामक ठरला। रामायण डोक्यावर घेणारी महिला ही अबुधाबीच्या क्राऊन प्रिन्स यांची पत्नी किंवा त्यांच्या घराण्याशी संबंधित महिला नव्हती तर ती रामकथा आयोजकांची मुलगी होती. याबदद्ल मोरारी बापू यांनी स्वत : एका टिव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली होती. 
 
Tools Used 
 
  • Twitter Advanced Search
  • Youtube Search
  • Facebook Search
  • Google keywords Search 
 
Result- Misleading
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular