Friday, July 11, 2025

Marathi

एनआरसी, सीएए समर्थकांची नाही ही गर्दी, मराठा क्रांती मोर्चाचे जुने फोटो चुकीच्या दाव्याने झाले व्हायरल

Written By Yash Kshirsagar
Dec 23, 2019
image

Claim-

NRC आणि CAA च्या समर्थानार्थ मुंबईत उसळला जनसागर, विरोध करणारे खुप बघितले आता आता समर्थक पण बघा. 
 
 
 
Verification- 
 
सध्या देशात एनआरसी आणि सीएए बिलारुन मोठया प्रमाणात नागरिकांंमध्ये संभ्रम असल्याने अंसतोषाचे वातावरण तयार झाले आहे. या बिलांच्या विरोधात मोर्चे निघाहेत. अनेक ठिकाणी काही हिंसा निर्माण झाल्याने काही लोक ठारे झाले तर जाळपोळीच्या घटनाही घडल्या. अशातच एनआरसी आणि सीएएच्या समर्थनार्थ लाखों लोक मुंबईत जमा झाल्याचे फोटो ट्विटर वर व्हायरल झाले. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, विरोध करणारे लोक खुप पाहिले आता समर्थक देखील पहा. 
 
आम्ही या संदर्भात शोध घेतला असता ट्विटरवर हाच दावा करणारे अनेक ट्विट्स आढळून आले. 
 
 
 
 
याशिवाय फेसबुकवर देखील ही पोस्ट व्हायरल होत आहे. 
 
 
आम्ही याबाबत काही किवर्ड्च्या आधारे शोध घेतला असता मुंबईत मोर्चा निघाल्याच्या काही बातम्या आढळून आल्या मात्र यात व्हायरल फोटो नव्हते मात्र एनआरसी समर्थानार्थ लोक जमा झाल्याची बातमी आढळून आली नाही. 
 
 
यानंतर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज आणि यांडेक्सच्या मदतीने व्हायरल फोटोची पडताळणी सुरू केली असता.  आम्हाला दैनिक लोकसत्तामध्ये तीन वर्षांपूर्वी छापून आलेली बातमी मिळाली. त्यात हा व्हायरल फोटोमधील एक फोटो होता. मराठा आरक्षणासाठी आणि कोपर्डी प्रकरणातील निर्भयाला न्याय मिळण्यासाठी अहमदगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन केले होते त्यावेळचा हा फोटो आहे हे या बातमीमुळे समोर आले. 
 
 
 
शिवाय एबीपी माझा या वृत्तवाहिनीची बातमी देखील मिळाली. 
 
 
 
यानंतर आम्ही दुस-या फोटोची पडताळणी करण्याचे ठरवले असता आम्हाला आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर आॅक्टोबर 2016 मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात हा फोटो आढळून आला. लेखात हा फोटो सांगलीत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचे म्हटले आहे. 
 
यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल फोटो हे तीन वर्षापूर्वीच्या मराठा क्रांती मोर्चांचे आहेत मुंबईत एनआरसी आणि सीएबी समर्थनार्थ गोळा झालेल्या जनसमुदायाचे नाहीत. सोशल मीडिया चुकीच्या दाव्यानिशी हे फोटो व्हायरल झाले आहेत. 
 
 
Tools Used 
 
  • Twitter Advanced Search
  • Google Search
  • Facebook Search 
 
Result- False 
 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)
image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
ifcn
fcp
fcn
fl
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

18,924

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage