Claim-
एसटीच्या स्मार्ट कार्डमुळे चार हजार किलोमीटर मोफत प्रवास, वाचा काय आहे सत्य?
Verification-
राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत प्रवासा योजनेविषयी एक पोस्ट सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना वर्षभर चार हजार किलोमीटर मोफत प्रवासाची संधी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अशीच एक पोस्ट आम्हाला Sharechat या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म वर आढळून आली.
या पोस्टमध्ये लिहिले आहे की “एसटी महामंडळाचा नविन उपक्रम वय वर्ष 65 असणा-या ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार स्मार्ट कार्ड. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चार हजार किलोमीटरचा प्रवास फ्री. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्तुत्य उपक्रम. यासाठी लागणारी कागदपत्रे- 1 आधारकार्ड 2. मतदान ओळखपत्र 3. सोबत ती व्यक्ती 4. नाममात्र 55 रुपये फी. कृपया सर्व ज्येष्ठ व्यक्तींनी सदरची कागदपत्रे तसेच मोबाईल घेऊन नजीकच्या एसटी डेपोत स्वत:जावे”
आम्ही या पोस्टची सत्यता पडताळण्याचे ठरविले. सगळ्यात आधी
राज्य परिवहन महामंडळाच्या वेबसाईटवर या योजनेबद्दल काही माहिती मिळतेय का ते पाहिले असता ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणा-या सवलतींचा तक्ता आढळून आला. या माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाकडून साध्या, निमआराम, शिवशाही (स्लिपर आणि सिटिंग) बसमध्ये प्रवासभाड्यात सवलत 4 हजार किलोमीटरपर्यंत देण्यात येत आहे. साध्या, निमआराम बसमध्ये प्रवासभाड्यात 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. आसन व्यवस्था असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासभाडयात ही सवलत 45 टक्के आहे. शयनशान व्यवस्था असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासभाडयात ही सवलत 30 टक्के आहे.
आम्ही एसटीची ज्येष्ठांसाठी स्मार्ट कार्ड योजना या कीवर्ड द्वारे गुगल वर सर्च केले असता
दैनिक लोकमतच्या वेबसाईटवर 6 मार्च 2019 रोजी प्रकाशित झालेली एक बातमी मिळाली. या बातमीचे हेडिंग- ज्येष्ठांसाठी एसटीची स्मार्ट कार्ड योजना असे होते. बातमी दिलेल्या माहितीनुसार बनावट कार्डला आळा घालण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरु करण्यात आली आली आहे. मात्र ज्येष्ठ नागिरकांना 4 हजार किलोमीटरचा मोफत प्रवास योजनेबाबत कसलाही या बातमीत उल्लेख करण्यात आलेला नाही.
लोकसत्ता ने याबाबत वृत्त दिले आहे पण यातही ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा उल्लेख नाही.
आम्ही योजनेबाबतचा शोध सुरुच ठेवला असता 9 मे रोजी
दैनिक पुढारी मध्ये स्मार्ट कार्ड योजनेबाबतची बातमी छापण्यात आलेली बातमी मिळाली. या बातमीत ही योजना त्रासदायक ठरत असल्याचे म्हटले आहे. बातमीत कोल्हापूर आगारातील एका लिपिकाने 55 रुपयात 4 हजार किलोमीटरचा मोफत प्रवास ही पोस्ट व्हायरल केली असून महामंडळाने त्याच्यावर कडक कारवाई केली असल्याचे म्हटले आहे, मात्र 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी देण्यात येणा-या सवलतींचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक आहे. त्याची वैधता एक वर्ष असेल.
यातून हेच स्पष्ट होते की स्मार्ट कार्ड द्वारे चार हजार किलोमीटर मोफत प्रवासाची योजना ही अफवा आहे.
Tools Used
Result- Misleading