Thursday, March 28, 2024
Thursday, March 28, 2024

HomeMarathiजामिया मिलियातील विद्यार्थ्याने गोळाबारात जखमी झाल्याचे नाटक केले नाही, व्हायरल झाला खोटा...

जामिया मिलियातील विद्यार्थ्याने गोळाबारात जखमी झाल्याचे नाटक केले नाही, व्हायरल झाला खोटा दावा

Authors

Claim

जामिया मिलियात गोळीबारात जखमी झालेल्या युवकाच्या हातातून रक्त निघाले नाही ते केचअप होते, कमी कमी केचअपची तरी लपवायचे होते.

Verification
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान एका युवकाने  गोळ्या झाडल्या यात एका विद्यार्थाला गोळी लागली. त्या विद्यार्थ्याचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काही पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की विद्यार्थ्याला गोळी लागली नसून त्याचा हातातून रक्त नाही वाहत नाही तर ते टोमॅटो केचप आहे हे त्याच्या हातातील लाल रंगाच््या बाटली वरुन दिसून येते. त्याने किमान ते केचप तरी व्यवस्थित लपवायचे होते असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आम्ही या संदर्भात पडताळणी करण्याचे ठरवले. गूगलमध्ये काही कीवर्डसच्या मदतीने शोध घेतला असता आम्हाला जामिया मिलिया इस्लामिया मध्ये युवकाने केलेल्या गोळीबारासंबंधी अनेक बातम्या आढळून आल्या.
यात दैनिक भास्करच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेली बातमी देखील आढळून आली. या बातमीत हल्लेखोर युवकाचे नाम रामभक्त गोपाल असल्याचे म्हटले आहे तर जखमी विद्यार्थ्याचे नाव शाबाद फारुख असल्याचे म्हटले आहे. रात्री उशिरा कुलगुरू त्या जखमी विद्यार्थ्याला हाॅस्पिटलमध्ये भेटण्यास गेल्याचे म्हटले आहे. या सर्व बातम्यांत कुठेही त्या विद्यार्थ्याने हाताला केचप लावल्याचे म्हटलेले नाही.
त्या जखमी विद्यार्थ्याला सुरूवातीला जवळील होली फॅमिली हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे न्यूजडी या वेबसाईटवरील बातमीत म्हटले आहे.
यानंतर त्याला एम्स हाॅस्पिटलमधील ट्रामा सेंटरमध्ये हलविण्यात आले. तेथे त्याची विशेष पोलिस आयुक्त प्रवीण रंजन यांनी भेट घेऊन विचारपूस केल्याचे ट्विट एएनआई ने केले आहे.
यात कुठेही त्याने हाताला केचअप लावल्याचे किंवा जखमी झाल्याचे नाटक केले असल्याचा उल्लेख नाही. तसेच पोलिसांनी देखील असे कुठेही म्हटलेले नाही.
यावरुन हेच स्पष्ट होते की, सोशल मीडियामध्ये जामिया मिलाियामध्ये गोपाल नावाच्या युवकाच्या गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा फोटो खोट्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Sources
Facebook Search
Google Search
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular