Claim–
महाशिवआघाडी सरकारची खाते वाटपाची यादी जाहिर. शिवसेनेला 15 तर राष्ट्रवादीला 13 आणि काॅंग्रेसला 13 खाती मिळणार
Verification-
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, मात्र ते मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित होण्याआधी पासून महाशिवआघाडी ( महाविकासआघाडी) सरकारमधील तीनही पक्षांना कोणती खाती मिळणार याची यादी असणारी पोस्ट सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहे. यात पोस्टमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस पक्षाला कोणती आणि किती खाती मिळणार याची यादी देण्यात आली आहे. यानुसार शिवसेनेला 15 तर राष्ट्रवादीला 13 आणि काॅंग्रेसला 13 खाती मिळणार असल्याचे म्हटले आहे.
आम्ही या पोस्टची पडताळणी करण्याचे ठरविले असता फेसबुक वर अशीच एक पोस्ट आढळून आली.
व्हायरल होत असलेल्या पोस्टविषयी शंका वाटली कारण शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस ने मिळून स्थापन केलेल्या सरकारचे नाव है महाविकासआघाडी सरकार आहे. यापूर्वी महाशिवआघाडी सरकार असे नाव असण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र नवीन दिल्लीत झालेल्या तीनही पक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबद्दल
सकाळमध्ये बातमी छापून आली होती. या बातमीत देखील खाती वाटपाचा उल्लेख केलेला नाही.
आम्ही गूगलमध्ये काही किवर्ड्स आधारे नवीन सरकारच्या खातेवाटपाच्या संदर्भात काही माहिती मिळतेय का याचा शोध घेतला असता 11 नोव्हेंबर रोजी
बीड रिपोर्टर या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली बातमी मिळाली. या नुसार
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याचे दिसून येत असतांनाच शिवसेनेसोबत युती करतांना कुठलीही घाई नसल्याचे कॉंग्रेसकडून सांगण्यात येते. काही मुद्द्यांवर स्पष्ट चर्चा करून राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होईल. हे करतांना शिवसेनेकडे पाच वर्षासाठी मुख्यमंत्री पद तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाकडे पाच वर्षासाठी उपमुख्यमंत्री पद दिले जाणार असून मंत्रीमंडळात सेनेचे १५ राष्ट्रवादीचे १४ आणि कॉंग्रेसचे १३ आमदारांचा समावेश असेल. असे स्पष्ट वृत्त विश्वसनीय सुत्रांच्या आधारे इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
मात्र ही बातमी अधिकृत नाही सूत्राच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
फडणवीस सरकार- 2 तीन दिवसांत कोसळल्यानंतर महाविकासआघाडीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला शिवाय किमान समान कार्यक्रमावर देखील चर्चा झाली मात्र खाते वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याबाबत
लोकसत्ता मध्ये बातमी छापून आली होती.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह 6 मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर कॅबिनेट बैठक बोलवण्यात आली होती मात्र या आधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपमुमंत्री पदी अजित पवार हेच विराजमान होणार असल्याचे
बीबीसी ला सांगितले होते मात्र त्यानी त्यांच्या आपल्या पक्षाला कोणती खाती मिळणार याबद्दल भाष्य केलेले नाही.
यावरुन हे स्पष्ट होते की महाविकास आघाडी सरकारच्या नवीन मंत्रीमडळाच्या खाती वाटपाची अधिकृत घोषणा झालेली नसून सोशल मीडियात खोट्या पोस्ट पसरवल्या जात आहेत.
Tools Used
- Google Keyword Search
- Facebook Search
Result- False