Claim–
6 साल बाद फिर बजरंग दल हरकत में 8 लाख से ऊपर भक्त बंगाल में दाखल। करारा जवाब मिलेगा।
मराठी अनुवाद- सहा वर्षानंतर पुन्हा एकदा बजंरंग दल सक्रिय, आठ लाखांपेक्षा जास्त भक्त बंगालमध्ये दाखल. जबरदस्त उत्तर मिळेल.
Verification–
सध्या सुधारित नागरिकता कायद्याविरोधात (सीएबी)भारतातील काही राज्यामंध्ये आंदोलने सुरू आहेत. अशातच फेसबुकवर बंगालमध्ये 8 लाख कार्यकर्ते जमा झाल्याचा फोटो वायरल झाला असून या पोस्टमध्ये ठोस उत्तर मिळणार असल्याचेही म्हटले आहे. हे कार्यकर्ते 6 वर्षानंतर पुन्हा बंगालमध्ये जमले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
आम्ही याबाबत पडताळणी करण्याचे ठरविले असता आम्हाला फेसुबक वर अशीच एक पोस्ट पहायला मिळाली पण यात वरील फोटो नव्हता.
व्हायरल होत असलेल्या फोटो आणि पोस्टची पडताळणी करण्यास सुरूवात केली. आम्ही काही किवर्ड्स आधारे गूगलमध्ये शोध घेतला असता आम्हाला बंजरंग दलाचे आठ लाख कार्यकर्ते बंगालमध्ये दाखल झाल्याची बातमी कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे आम्ही व्हायरल फोटोचा गूगल रिव्हर्स इमेज द्वारे शोध घेतला. आम्हाला दैनिक सकाळ च्या ट्विटर हॅंडलवर चार वर्षापूर्वीचे 25 सप्टेंबर 2016 रोजीचे ट्विट आढळून आले हा फोटो पुण्यातील मराठा मोर्चाचा असल्याचे यात म्हटले आहे.
तसेच हा फोटो बारकाईने पाहिल्यास यात एक होर्डिंगवर दिलेला एसटीडी कोड 020 आहे हा कोड पुण्याचा आहे तसेच दुस-या होर्डिंगवर मराठा हे नाव मोठ्या अक्षरात लिहिलेले आपल्याला स्पष्ट दिसते.
याशिवाय आम्हाला युट्यूबवर देखील मराठा क्रांति मूक मोर्चाचे व्हिडिओ आढळून आले
त्यावेळी एबीपी माझा ने देखील या मोर्चाची बातमी दिली होती.
दैनिक लोकसत्ता सह अनेक राष्ट्रीय वर्तमानपत्रात देखील मराठा क्रांती मूक मोर्चाची बातमी छापून आली होती.
यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल फोटो हा बंगालमधील बजरंग दलाच्या कार्यकर्तांच्या मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मिळण्यासाठी पुण्यात आयोजित केलेल्या मराठा क्रांती मोर्चाचा फोटो आहे. सध्या सीएबी च्या पार्श्वभूमीवर हा फोटो सोशल मिडियात चुकिच्या दाव्यानिशी व्हायरल होत आहे.
Tools Used
- Google Reverse Image
- Facebook Search
Result- Misleading