Home Marathi लाॅकडाऊनमध्ये आंबेडकर जंयती साजरी करायला निघालेल्या युवकांना पोलिसांनी चोप दिला? वाचा सत्य

लाॅकडाऊनमध्ये आंबेडकर जंयती साजरी करायला निघालेल्या युवकांना पोलिसांनी चोप दिला? वाचा सत्य

Claim

काही युवक लाॅकडाउन असतानादेखील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करायला चालले होते पोलिसांनी त्यांना चोप दिला.

सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म शेअरचॅटवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत पोलिस काही तरुणांना रस्त्यात उठाबशा काढायला लावत असल्याचे दिसते. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की सकाळी सकाळी भीमजंयती साजरी करायला निघालेल्या तरुणांना पोलिसांनी चोप दिला.
Verification
आम्ही व्हायरल पोस्ट संदर्भात पडताळणी सुरु केली. लाॅकडाऊनच्या काळात भीमजयंती कशी साजरी झाली याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. गूगलमध्ये काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला या संदर्भात काही बातम्या आढळून आल्या.
आम्हाला 14 एप्रिल रोजीची एबीपी माझाची बातमी आढळून आली यात म्हटले आहे की, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 129 वी जयंती आहे. मात्र, यंदाच्या बाबासाहेबांच्या जयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाची भीम जयंती घरातच साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार राज्यभरात आंबेडकरी अनुयायींनी घरातच आंबेडकर जयंती साजरी करत बाबासाहेबांना अभिवादन केलं.
याशिवाय लोकसत्ताची बातमी देखील आढळून आली यात देखील आंबेडकर जयंती लोकांनी घरातच साजरी केल्याचे म्हटले आहे.
आम्हाला व्हायरल पोस्टच्या आशयाची बातमी कुठेही आढळून आली नाही त्यामुळे आम्ही पोस्टमधील फोटो गूगल रिव्हर्स इमेज आणि यांडेक्स मदतीने शोधला असता याबाबत काही परिणाम मिळाले फ्रेशर लाईव्ह नावाच्या इंग्रजी वेबसाईटवर हा फोटो 25 मार्च रोजी अपलोड करण्यात आला आहे. याच्या कॅप्शमध्ये म्हटले आहे की लाॅकडाऊनच्या काळात संचारबंदीचा नियम तोडून विनाकारण घराबाहेर पडणा-या लोकांना धडा शिकवण्यासाठी पोलिस अशा युक्त्यांचा वापर करत आहेत.
यानंतर आम्हाली हिंदी दैनिक प्रभात खबरच्या वेबसाईटवर देखील हा फोटो 25 मार्च रोजी अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले.  यात देखील लाॅकडाऊनचा नियम मोडल्याने युवकांना शिक्षा म्हणून उठाबशा काढायल्या लावल्याचे म्हटले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की, फोटो 14 एप्रिल चा नाही तर त्या आधीचा आहे. लाॅक डाऊनचे महत्व समझण्यासाठी युवकांना पोलिसांनी उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. हा फोटो 14 एप्रिलला भीमजंयती साजरी करण्यासाठी निघालेल्या युवकांचा असल्याचा भ्रामक दावा सोशल मीडियात करण्यात आला व याच दाव्याने हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. मात्र आमच्या पडताळणीमध्ये हा दावा असत्य असल्याचे आढळून आले आहे.
Source
Google Search
Yandex
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)