Claim– पुलवामा हल्ला हा भाजपचा पूर्वनियोजित कट होता : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान
Verification–
विंग कमांडर अभिनंदन यांच्या व्यक्तव्याचे एक वर्तमात्रपत्राचे कटिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आम्हाला ट्विटरवर देखील हे कटिंग आढळून आले आहे. या कटिंगमध्ये विंग कमांडर अभिनंदनचा फोटो आहे आणि त्या फोटो पुढे लिहिले आहे- पुलवामा हमला, पाकिस्तान पर सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट हमला बीजेपी की सोची समझी साजिश थी। मोदी को चुनाव जीतने के लिए इमरान खान मदद कर रहा है। ( मराठी अनुवाद- पुलवामा हल्ला, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट हल्ला हा बीजेपीचा पूर्वनियोजित कट होता।.मोदींना निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी इम्रान खान मदत करत आहे)
आम्ही काही कीवर्डसच्या आधारे पुलवामा हल्ला तसेच बालाकोट हल्ला या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला काही बातम्या गूगलमध्ये आढळून आल्या. मात्र यात कुठेही बीजेपीचा पूर्वनियोजित कट होता असा उल्लेख नाही.
विंग कमांडर वर्धमान अभिनंदन यांचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियात आढळून आले मात्र यात देखील त्यांनी असा कोणताही खुलासा केलेला नाही.
याबाबत शोध सुरुच ठेवला, गूगल रिव्हर्स इमेजची सहायता घेतली असता आम्हाला विश्वास न्यूज या फॅक्ट चेकिंग वेबसाईटने दैनिक जागरण मध्ये प्रसिद्ध केलेल्या फॅक्ट चेकिंगचे कटिंग आढळून आले.
यावरुन हेच स्पष्ट होते कि विंग कमांडर अभिनंदन यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेेले नाही. विश्वास न्यूजने फॅक्ट चेकिंग केले होते त्या बातमीचे अर्धे कटिंग सोशल मीडियात व्हायरल करुन संभ्रम निर्माण करण्यात आला आहे.
Sources
Twitter Advanced Search
Google Search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)