Claim–
सातारा लोकसभा पोटनिवडुकीनिमित्त घेण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत अलोट गर्दी उसळी, सातारा भगवामय झाला.
Verification
Bigg Birdd नावाच्या ट्विटर हॅंडलवर नरेंद्र मोदींच्या सभेचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. यात हजारो नागरिक मोदींजी सभा एेकायला जमलेले दिसत आहे. हा व्हिडिओ नरेंद्र सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेंदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या प्रचारसभेचा असल्याचा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांसाठी 21 आॅक्टोबरला मतदान होत आहे. याच दिवशी सातारा लोकसभा मतदारसघांची पोटनिवडणुकदेखील आहे. या निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची साता-यात नरेंद्र मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. याबाबत आम्ही गुगलच्या साहाय्याने माहिती घेतली तसेच ट्विटमध्ये शेअर करण्यात आलेली 24 सेकंदांची व्हिडिओ क्लिप याच सभेची आहे का याची पडताळणी सुरु केली. सर्वप्रथन गुगल मध्ये
साता-यात नरेंद्र मोदींच्या सभेला प्रचंड गर्दी या किवर्ड्स द्वारे गुगलमध्ये शोध घेतला आम्हाला दैनिक
लोकसत्ताच्या वेबसाईटवर मोदींच्या सभेची बातमी आढळून आली.
बातमीनुसार नरेंद्र मोदींनी विरोधकांवर कठोर टीका केली. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसला लोकभावना समझत नाही. जनतेने त्याबद्दल त्यांंना लोकसभा निवडणुकीतही शिक्षा दिली आहे या निवडणुकीतही जनता विरोधकांना कडक शिक्षा देईल, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.
या बातमीसोबतच आम्हाला नरेंद्र मोदींच्या भाषणाचा पूर्ण व्हिडिओ देखील युट्यूबवर मिळाला.
व्हायरल व्हिडिओंध्ये क्लिप मध्ये नरेंद्र मोदींनी हाफ बाह्यांचा शर्ट घातला आहे तर या व्हिडिओत फुल बाह्यांचा शर्ट घातलेला दिसून आला त्यामुळे व्हायरल व्हिडिओबद्दल शंका निर्माण झाली.
व्हायरल व्हिडिओबाबात काही माहिती मिळतेय का हे शोधण्यासाठी क्लिपमधून काही स्क्रिनशाॅट्स काढले व गुगल रिवर्स इमेज आणि यांडेक्सच्या मदतीने शोध घेतला. असता आम्हाला 6 महिन्यापूर्वी अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले.
तसेच सहा महिन्यापुर्वीचे एक ट्विट आढळून आले. यात हा व्हिडिओ कोलकाता येथील प्रचारसभेचा असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
याशिवाय
फायनांशियल एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी ही मिळाली. यात नरेंद्र मोदींचा हाफ बाहयांचा शर्ट घातलेला फोटो देखील आहे. बातमीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावरून जोरदार टीका केली. कोलकाता येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याचे ‘ढकोसला पत्र’ असे वर्णन केले.
या प्रचारसभेचा व्हिडिओ पहा.
यावरुन स्पष्ट होते की ट्विटर वर पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या साता-यातील सभेच्या नावाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ 6 महिन्यांपूर्वीचा असून तो लोकसभा निवडणुकी दरम्यान पश्चिम बंगालमधील येथील प्रचारसभेचा आहे.
Tools Used
- Twitter Advanced Search
- Google keywords Search
- YouTube Search
Result- False