Claim–
हैद्राबाद बलात्कार पिडितेचा अंत्यसंस्काराचा व्हिडिओ, भावपूर्ण श्रद्धाजली
Verification-
सोशल मीडियामध्ये सध्या एक अंत्यसस्काराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हैद्राबादमधील बलात्कार पिडितेच्या अंत्यसंस्काराचा असल्याचा दावा केला जात आहे. पोस्टमधील व्हिडिओत अंत्यसंस्कारला लोकांनी प्रंचड गर्दी केल्याचे दिसून येत आहे. हैद्राबादमध्ये एक व्हेटरनरी डाॅक्टर महिलेवर चार नराधमांनी बलात्कार केला आणि नंतर तिला जाळून मारण्यात आले. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले मात्र त्यानंतर या घटने नंतर सोशल मीडियात यासंबंधी फेक न्यूज देखील पहायला मिळाला. म्हणून आम्ही या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्याचे ठरवले असता फेसबुक वर हाच दावा करणा-या अनेक पोस्ट आढळून आल्या.
याशिवाय ट्विटरवर देखील हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
आम्हील गूगलमध्ये सामूहिक बलात्कार पीडितेच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ शोधला असता आम्हाला वरील व्हिडिओ आढळून आला नाही. हैद्राबादमध्ये 27 नोव्हेंबर रोजी स्कूटीची पंक्चर दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने चार नराधमांनी महिला डाॅक्टरसोबत कुकर्म केले आणि नंतर 40 किलोमीटर अंतरावर एका शेतात मृतदेह जाळला. 28 नोव्हेंबरला एका पुलाजवळ जळालेला मृतदेह आढळल्याने या घटनेचा खुलासा झाला.
ईटीव्ही आंध्रप्रदेश च्या बातमीनुसार 28 नोव्हेंबर रोजी हैद्राबाद मधील जुना पुलस कब्रिस्तानमध्ये पिडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. खालील व्हिडिओत आपण पाहू शकता.
याशिवाय
साक्षी समाचार या हिंदी दैनिकात देखील अंत्यसंस्काराचा फोटो छापला आहे. पिडितेचा अंत्यसंस्कार हा शहरी भागात आणि बंद जागेत झाल्याचे दिसते.
व्हायरल व्हिडिओ हा नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळाली नाही मात्र तो हैद्राबाद बलात्कार पिडितेच्या अंतसंस्कारा नाही हे स्पष्ट झाले. सोशल मिडियात अज्ञात ठिकाणचा व्हिडिओ हा हैद्राबादच्या नावाने व्हायरल करुन भ्रामकता परसवली जात आहे.
Tools Used
Result- False