Thursday, March 28, 2024
Thursday, March 28, 2024

LATEST ARTICLES

गुजरात विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळताच हार्दिक पटेलने भाजपवर टीका केली का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य

गुजरात विधानसभा निवडणुकीचा उत्साह वाढत असताना भाजप नेते हार्दिक पटेल यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते भाजप सरकारवर टीका करताना दिसत आहेत. तिकीट मिळाल्यानंतरच हार्दिक पटेलने रंग बदलला आणि आता भाजपवर टीका करत असल्याचा दावा केला जात आहे.

Weekly Wrap: शाहरुख खानचा जुना व्हिडिओ, गुगल पे बद्दल व्हायरल दावा आणि या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक

आठवड्याच्या सुरुवातीलाच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला मुंबईत कस्टम अधिकाऱ्यांनी रोखल्याचा दावा व्हायरल झाला. तुमच्या गुगल पे खात्यावरून सहजासहजी पैसे लंपास करण्यात येत असल्याच्या संदेशांनी संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला. या जगात गाय हा असा एकमेव प्राणी आहे जो श्वसन करताना आतमध्ये ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजनच बाहेर सोडतो असा दावा करण्यात आला, तर अफजल खानाची कबर पाडली म्हणून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना रडू कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो हाती घेतल्याचा दावा करण्यात आला.

कायरन पोलार्ड च्या नावे मुंबईत रस्ता? व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे वाचा

चाहत्यांमध्ये 'पॉली' म्हणून ओळखला जाणारा आणि २०१० पासून मुंबई इंडियन्स च्या माध्यमातून आयपीएल गाजविणारा क्रिकेटर कायरन पोलार्ड याने आपली निवृत्ती जाहीर केली. या पोलार्ड चे नाव आता मुंबई येथील रस्त्याला देण्यात आले आहे, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईसाठी खेळलेला क्रिकेटर म्हणून त्याला मुंबई महानगरपालिकेने अशा पद्धतीने ट्रिब्यूट दिला आहे. असाच या दाव्याचा अर्थ आहे.

राहुल गांधी यांच्या हाती फोटो गोपीनाथ मुंडेंचा? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे

देशभरात सध्या गाजत असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आली आणि सोशल मीडियावर विविध पोस्ट चा पाऊस पडू लागला. या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो घेऊन चालल्याची पोस्टही अशीच व्हायरल झाली. गोपीनाथ मुंडे हे एक ज्येष्ठ नेते होते त्यामुळे भाजप चे असले तरी राहुल गांधी यांनी त्यांची प्रतिमा आपल्या हाती घेतली. राहुल गांधी राजकारणाच्या पलीकडील नाते जपत आहेत

कबर पाडली म्हणून जितेंद्र आव्हाड यांना रडू कोसळले? दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ आत्ताचा म्हणून व्हायरल

राष्ठ्रवादीचे नेते, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाढ हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. हर हर महादेव चित्रपट प्रकरण असो किंवा त्यांच्यावर झालेली विनयभंगाची केस असो ते चांगलेच गाजत आहेत. यामुळे त्यांच्याबद्दलच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. "जितू मिया यांना अफजलखान याची कबर तोडल्यावर झालेलं दुःख" या कॅप्शन खाली त्यांचा एक रडतानाचा व्हिडीओ सध्या व्हाट्सअप वर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आपण खाली पाहू शकता.

काय गाय हा असा एकमेव प्राणी आहे जो ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजनच सोडतो? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे

गाय ही हिंदू धर्मात माता म्हणून पुजली जाते. गाय आणि तिचे विविध गुणधर्म वारंवार पूजिले जातात. कामधेनू म्हणून ओळखली जाणारी गाय हा असा एकमेव प्राणी आहे की जी श्वसन करताना ऑक्सिजन आतमध्ये घेऊन ऑक्सिजनच बाहेर सोडते असा एक दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या संदर्भातील अनेक पोस्ट आपण फेसबुक आणि ट्विटर वर पाहू शकता.