Wednesday, April 24, 2024
Wednesday, April 24, 2024

LATEST ARTICLES

कबर पाडली म्हणून जितेंद्र आव्हाड यांना रडू कोसळले? दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ आत्ताचा म्हणून व्हायरल

राष्ठ्रवादीचे नेते, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाढ हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. हर हर महादेव चित्रपट प्रकरण असो किंवा त्यांच्यावर झालेली विनयभंगाची केस असो ते चांगलेच गाजत आहेत. यामुळे त्यांच्याबद्दलच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. "जितू मिया यांना अफजलखान याची कबर तोडल्यावर झालेलं दुःख" या कॅप्शन खाली त्यांचा एक रडतानाचा व्हिडीओ सध्या व्हाट्सअप वर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आपण खाली पाहू शकता.

काय गाय हा असा एकमेव प्राणी आहे जो ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजनच सोडतो? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे

गाय ही हिंदू धर्मात माता म्हणून पुजली जाते. गाय आणि तिचे विविध गुणधर्म वारंवार पूजिले जातात. कामधेनू म्हणून ओळखली जाणारी गाय हा असा एकमेव प्राणी आहे की जी श्वसन करताना ऑक्सिजन आतमध्ये घेऊन ऑक्सिजनच बाहेर सोडते असा एक दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या संदर्भातील अनेक पोस्ट आपण फेसबुक आणि ट्विटर वर पाहू शकता.

गुगल पे स्कॅम चे मेसेज व्हायरल होत आहेत, काय आहे यावर तज्ञांचे मत

तुमच्या गुगल पे खात्यावरून सहजासहजी पैसे लंपास करण्याचा नवा फ्रॉड सुरु आहे. सावधगिरी बाळगा नाहीतर हातचे पैसे घालवाल असे सांगणारे संदेश सध्या व्हायरल होत आहेत.आपल्याही वाचनात असे अनेक मेसेज आले असतील ज्यामध्ये असा मजकूर पाहायला मिळेल की सावधान आपण फसू शकता आणि फसवणारे जोरदार कामाला लागले आहेत.असे मेसेज आणि गुगल पे स्कॅम चे नेमके काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.

शाहरुख खानचा हा फोटो तीन वर्षे जुना, मुंबई विमानतळावरील कस्टम ड्युटी प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही

शनिवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी रोखले आणि दंड ठोठावला अशी बातमी आली.शाहरुखचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हात पसरून उभा असून सुरक्षा कर्मचारी त्याची तपासणी करताना दिसत आहेत.शाहरुखला सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर थांबवले तेव्हाचा अर्थात शनिवारचा हा फोटो आहे,अशा पद्धतीने हे चित्र मांडले जात आहे.

Weekly Wrap: या आठवड्यात व्हायरल झालेल्या टॉप बनावट दाव्यांचे फॅक्ट चेक

ABP ने आपल्या ओपिनियन पोलमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या आघाडीचा अंदाज वर्तवला आहे,असा दावा एका व्हिडिओद्वारे करण्यात आला.यापूर्वी देशाच्या काही भागात झालेल्या भूकंपानंतर एका कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.कुत्र्याचा हा व्हिडिओ दिल्ली-एनसीआरमधील घराजवळचा असल्याचा दावा करण्यात आला होता.खाण्याच्या सोड्याने कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो

बेकिंग सोडा कर्करोगावर उपचार करू शकतो?व्हायरल दाव्याचे सत्य येथे वाचा

बेकिंग सोडा खाल्ल्याने कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो,असा दावा करीत सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.या दाव्यावर शिक्कामोर्तब करत टाटा मेमोरियलचे डॉ. राजेंद्र ए. बर्वे यांनी हे फॉरवर्ड करण्यास सांगितले असल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे.