Thursday, April 25, 2024
Thursday, April 25, 2024

LATEST ARTICLES

कॅडबरी उत्पादनांमध्ये बीफ? खोटा दावा पुनरुज्जीवित करीत झाला व्हायरल

चॉकलेट उत्पादनातील दिग्गज कॅडबरीच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये असे लिहिले आहे की,''कृपया लक्षात ठेवा,आमच्या उत्पादनातील घटकांमध्ये वापरलेले जिलेटिन हे हलाल प्रमाणित आहे आणि ते उत्तम गोमांसापासून तयार केलेले आहे.”स्क्रीनशॉट शेअर करणारे वापरकर्ते दावा करतात की कॅडबरी भारतातील हिंदूंना त्यांच्या उत्पादनांद्वारे त्यांच्या नकळत गोमांस खायला लावत आहे.न्यूजचेकरला हा दावा खोटा असल्याचे आढळले.

ऋषी सुनक यांनी मनमोहन सिंग यांचे कौतुक करताना हे विधान केले होते का? व्हायरल ग्राफिक संपादित

ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.हा दावा दैनिक भास्करच्या एका कथित पोस्टद्वारे करण्यात आला आहे,त्यानुसार ऋषी सुनक म्हणाले की,भारताला योग्य दिशा देण्यासाठी आणि घसरत चाललेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानांची गरज आहे.ही पोस्ट फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.

स्केच आर्टिस्ट नूरजहानची अद्याप गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली नाही

पुढे,आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत वेबसाइटवर “नूरजहान” आणि “स्केचिंग” पाहिले तेथे कोणताही निकाल मिळाला नाही.याव्यतिरिक्त,वेबसाइटवरील "आर्ट अँड क्राफ्ट" विभाग स्कॅन केल्यावर आम्हाला तिच्या नावाखाली कोणतेही रेकॉर्ड आढळले नाही.

ऋषी सुनकचा हा व्हिडिओ 10 डाउनिंग स्ट्रीटमधील गृहप्रवेशाचा नाही

ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हिंदू रितीरिवाजांचे पालन करत 10 डाऊनिंग स्ट्रीट येथील घरात प्रवेश केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. हा दावा ऋषी आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्या व्हिडिओद्वारे करण्यात येत आहे. 10 डाउनिंग स्ट्रीट हे ब्रिटनच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय आहे.

आता देशात 3G आणि 4G फोन बनणारच नाहीत का? भारत सरकारने असा कोणताही आदेश दिलेला नाही, येथे जाणून घ्या सत्य

1 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 5G सेवा सुरू केली.अशा परिस्थितीत आधीच 5G फोन वापरणाऱ्या किंवा तो खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाची लाट आहे.त्यामुळे त्याच वेळी 2G, 3G आणि 4G वापरणारे वापरकर्ते फोन किंवा सिम कार्ड बंद झाल्याच्या दाव्यामुळे चिंतेत आहेत.या संदर्भाने,सोशल मीडिया वापरकर्ते एक छायाचित्र शेअर करत आहेत,ज्यात दावा केला जात आहे की भारत सरकारने स्मार्टफोन निर्मात्यांना 3G आणि 4G फोन बनवू नयेत असे आदेश दिले आहेत

भारत विरुद्ध वक्तव्य करणं ब्रिटिश गृहमंत्र्यांना पडलं भारी, व्हायरल दावा खोटा

ब्रिटनमधील राजकीय आणि आर्थिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी राजीनामा दिलाय.सुएला यांनी सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगितलं जात आहे. गेल्या आठवडाभरात पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातून आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे.दरम्यान त्यांच्या राजीनाम्याचा संदर्भ घेऊन अनेक दावे भारतात विशेषतः महाराष्ट्रात होत आहेत.सुएला ब्रेव्हरमन यांना भारता विरोधातील वक्तव्य भारी पडलं आणि त्यामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागला असा दावा प्रामुख्याने केला जात आहे.