Saturday, April 20, 2024
Saturday, April 20, 2024

HomeFact Checkअरविंद केजरीवाल यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी नमाज पठण केल्याचा फोटो व्हायरल, हे...

अरविंद केजरीवाल यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी नमाज पठण केल्याचा फोटो व्हायरल, हे आहे सत्य

Authors

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी जामा मशिदीत नमाज पठन केल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये केजरीवाल यांचा नमाज पठन करतानाचा फोटो शेअर केला असून यात म्हटले आहे की, वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्लीचे मालक श्री अरविंद केजरीवाल जामा मशिदीत जाऊन देश आणि दिल्लीसाठी दुवा मागितली.

संग्रहित /फेसबुक

हा दावा ट्विटर देखील व्हायरल होत आहे. यात देखील अरविंद केजरीवाल यांचा नमाज पठन करत असतानाचा फोटो शेअर करण्यात आलेला आहे.

संग्रहित

Fact Checking/Verification

अरविंद केजरीवाल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील जामा मशिदीत गेले होते का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र याबाबत आम्हाला बातम्या आढळून आल्या नाहीत. यानंतर आम्ही व्हायरल फोटो कधीचा आहे याचा रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली असता जनसत्ता मध्ये चार वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातमीत हा व्हायरल फोटो आढळून आला. मात्र हा फोटो कुठला आणि कधीचा आहे याची माहिती मात्र यात नाही.

या फोटोची अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला आप पंजाबच्या ट्विटर हॅंडलवर हा फोटो 7 जुलै 2016 रोजी अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले. पंजाबीतील या ट्विटचे अनुवाद केला असता ईदच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे आढळून आले. अधिक पडताळणी केली असता आम्हाला htsyndication.com या वेबसाईटवर अरविंद केजरीवाल यांचा व्हायरल फोटो आढळून ज्यात म्हटले आहे की, संगरुनमधील मारेलकोटला येथे रोजा सोडण्याच्या आधी नमाजी सोंबत नमाज पठन करताना अरविंद केजरीवाल.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, भारतात कोरोना लसीच्या आपतकालीन वापरासाठी मंजुरी मिळालेली नाही, सोशल मीडियात चुकीची माहिती व्हायरल झाली आहे.

Result: Misleading

Our Sources

Jansatta- https://www.jansatta.com/photos/picture-gallery/arvind-kejriwal-make-fun-of-modi-and-amit-shah/123455/

htsyndication.com- https://www.htsyndication.com/image/delhi-chief-minister-arvind-kejriwal-breaks-roza-/HTSI146775192146751

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular