Saturday, March 15, 2025

Fact Check

Fact Check: गर्भवती हत्तीणीला स्फोटकांनी भरलेले अननस खायला दिले होते ते मलप्पुरम गाव भूस्खलनात पूर्णपणे नष्ट झाले? येथे वाचा सत्य

Written By Sabloo Thomas, Translated By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
Aug 14, 2024
banner_image

Claim
गर्भवती हत्तीणीला स्फोटकांनी भरलेले अननस खायला दिले होते ते मलप्पुरम गाव भूस्खलनात पूर्णपणे नष्ट झाले.
Fact
खोटे. मलप्पुरम नव्हे तर वायनाडमध्ये भूस्खलन झाले. गर्भवती हत्तीणीचा मृत्यू मलप्पुरममध्ये नसून पलक्कड जिल्ह्यातील मन्नारक्कड जंगलात झाला.

वायनाडमध्ये 370 हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या विनाशकारी भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी दावा केला की मलप्पुरम नावाचे एक गाव, जेथे बॉम्बने भरलेले अननस खाल्ल्यानंतर एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला होता, भूस्खलनात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. अनेक लोकांनी हा दावा फेसबुक आणि X वर शेअर केला. ” आठवते? केरळमधील हत्तीबद्दल! गावातील काही लोकांनी गर्भवती हत्तीणीला अननसाच्या आत बॉम्ब टाकून खायला दिले. त्या गावाचे नाव “मल्लपुरम” आहे. यावेळी भूस्खलनात गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. निसर्गाच्या शिक्षा, न्याय, चक्र तुम्हाला हवे तसे समजून घ्या. अगदी तुमच्यासमोर.”

Weekly Wrap: गर्भवती हत्तीणीला स्फोटकांनी भरलेले अननस खायला दिले होते ते मलप्पुरम गाव भूस्खलनात पूर्णपणे नष्ट झाले? येथे वाचा सत्य
Facebook post by Humor Lust

अशा पोस्ट इथे, इथे आणि इथे बघता येतील.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Weekly Wrap: गर्भवती हत्तीणीला स्फोटकांनी भरलेले अननस खायला दिले होते ते मलप्पुरम गाव भूस्खलनात पूर्णपणे नष्ट झाले? येथे वाचा सत्य

Fact Check/ Verification

30 जुलै रोजी पहाटे वायनाड जिल्ह्यातील अनेक भागात भूस्खलनामुळे 370 हून अधिक लोक मरण पावले आणि अनेक जण जखमी झाले. भूस्खलनामुळे मेप्पडी, मुंडक्काई आणि चूरलमाला आदी गावांचे प्रचंड नुकसान झाले. तथापि, मलप्पुरम जिल्ह्यावर भूस्खलनाचा परिणाम झाल्याचे कोणतेही माध्यम वृत्त नाही. आम्ही मलप्पुरम जिल्हाधिकारी आणि केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पृष्ठे स्कॅन केली ज्यात मलप्पुरममध्ये भूस्खलनाचे कोणतेही संकेत दिले नाहीत.

त्यानंतर आम्ही अननसाच्या आत बॉम्ब खाल्ल्यानंतर गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्याच्या बातम्यांसाठी कीवर्ड शोध घेतला. आम्हाला आढळले की एनडीटीव्हीने जून 2020 मध्ये मलप्पुरममध्ये स्थानिकांनी ठेवलेले फटाक्याने भरलेले अननस खाल्ल्याने हत्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले होते. तथापि, त्यांनी नंतर त्यांचा लेख अपडेट केला की ही घटना पलक्कडमध्ये घडली आहे. लेखिका शैलजा वर्मा यांनी 4 जून 2020 रोजी X पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिले की त्यांना या घटनेच्या जिल्ह्याचे चुकीचे नाव सापडले होते.

4 जून 2020 रोजी, केरळ वन विभागाने एक एक्स पोस्ट देखील टाकली ज्यामध्ये असे म्हटले आहे की मलप्पुरममध्ये गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्याचा दावा करणारे मीडिया रिपोर्ट चुकीचे आहेत आणि ही घटना पलक्कडमध्ये घडली होती.

एएनआयच्या एक्स पोस्टनुसार, केरळचे तत्कालीन वनमंत्री के राजू यांनी 4 जून 2020 रोजी स्पष्ट केले की ही घटना मलप्पुरममध्ये नसून पलक्कडमध्ये घडली आहे.

Weekly Wrap: गर्भवती हत्तीणीला स्फोटकांनी भरलेले अननस खायला दिले होते ते मलप्पुरम गाव भूस्खलनात पूर्णपणे नष्ट झाले? येथे वाचा सत्य
X post by @ANI

शिवाय, बातम्या असे सूचित करतात की फटाक्यांनी भरलेले अननस शेतकऱ्यांनी रानडुकरांना मारण्यासाठी वापरले होते, कारण त्यांनी त्यांची पिके नष्ट केली होती आणि हत्तीला मारण्याचा हेतू नव्हता.

Conclusion

आमच्या तपासणीत असे आढळून आले की गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस कथितपणे “खायला” दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना मलप्पुरममध्ये नसून पलक्कड जिल्ह्यातील मन्नारक्कड जंगलात घडली होती. शिवाय, भूस्खलनामुळे प्रभावित उद्वस्थ झालेले ठिकाणही मलप्पुरम नसून वायनाड आहे.

Result: False

Sources
X post by @ANI on June 4, 2020
X post by @ShylajaVarma on June 4, 2020
X post by @ForestKerala on June 4,2020


(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी सबलू थॉमस यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,430

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage